तुम्ही जर आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून तुम्ही आयफोनला चक्क निम्म्या किंमतीत खरेदी करू शकता. Flipkart Big Billion Days Sale चा तुम्ही फायदा घेतला नसल्यास तुमच्याकडे पुन्हा एकदा आयफोनला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.
तुम्ही फ्लिपकार्टवरून आयफोन १२ ला स्वस्तात खरेदी करू शकता. वर्ष २०२० मध्ये लाँच झालेल्या या फोनवर तुम्हाला जवळपास ५० हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल.
iPhone 12 वर मिळेल बंपर
iPhone 12 चे ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ४८,९९९ रुपये किंमतीत फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. या स्मार्टफोनवर ७,१३० रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. कंपनीने या फोनला ७९,९०० रुपये किंमतीत लाँच केले होते. फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध असून, यामुळे तुम्ही फोनला अजूनच स्वस्तात खरेदी करू शकता.
हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....
ग्राहकांना या आयफोनवर बँक ऑफर्सचा देखील फायदा मिळत आहे. या फोनवर १७,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. बँक ऑफरबद्दल सांगायचे तर फेडरल बँक डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा वापर केल्यास १० टक्के अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल.
फोनचे १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ५३,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. तर, २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी तुम्हाला ६१,९९९ रुपये खर्च करावे लागतील. सर्व ऑफर्सचा फायदा मिळाल्यास फोनला निम्म्या किंमतीत खरेदी करू शकता.
दमदार फीचर्ससह येतो iPhone 12
iPhone 12 च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर यामध्ये ६.१ इंच ओलेड पॅनेल देण्यात आला आहे. फोन सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसह येतो. प्रोटेक्शनसाठी सेरेमिक शिल्डचा वापर करण्यात आला आहे. यात ए१४ बायोनिक चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. आयफोन १२ हा ६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज पर्यायासह उपलब्ध आहे.
यात तुम्हाला दमदार कॅमेरा देखील मिळेल. फोनमध्ये १२ मेगापिक्सल वाइड अँगल लेंस आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस मिळेल. तर फ्रंटला १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला आयपी६८ रेटिंग मिळाले आहे. फोनमध्ये दमदार बॅटरी दिली असून, यासोबत १७ तासांचा बॅकअप मिळतो. परंतु, फोन खरेदी केल्यास तुम्हाला बॉक्समध्ये चार्जर मिळणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.