Flipkart Big Diwali Sale 2024 esakal
विज्ञान-तंत्र

Flipkart Big Diwali Sale : उद्यापासून फ्लिपकार्टचा Big Diwali Sale सुरू; काय आहेत खास डिस्काउंट ऑफर्स? पाहा एका क्लिकमध्ये..

Saisimran Ghashi

Big Diwali Sale Offers : फ्लिपकार्टने 'बिग दिवाली सेल'ची घोषणा केली असून, ग्राहकांना स्मार्टफोन्स आणि इतर उत्पादनांवर मोठ्या सवलती मिळणार आहेत. 'बिग बिलियन डे' सेलनंतर लगेचच येणारा हा सेल 21 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र, फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सना 20 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासूनच या सेलमध्ये खरेदीची संधी मिळणार आहे.

या दिवाळी सेलमध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, टॅब्लेट्स, अ‍ॅक्सेसरीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर आकर्षक सवलती दिल्या जाणार आहेत. फ्लिपकार्टच्या माहितीनुसार, 19,999 रुपये किंमतीचा स्मार्टफोन या सेलमध्ये फक्त 9,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनवर बँकेकडून 1,500 रुपयांची थेट सवलत, 5,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. यामुळे खरेदीदारांना स्मार्टफोन खरेदीत तब्बल 10,000 रुपयांपर्यंतची बचत होणार आहे.

याशिवाय, ग्राहकांसाठी नो-कॉस्ट ईएमआयची सुविधाही उपलब्ध असेल. एसबीआय कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे, तर फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डधारकांना सर्व खरेदींवर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅकचा लाभ मिळेल.

या सेलमध्ये Apple, Samsung, Poco, Realme, Xiaomi, Motorola, आणि Vivo यांसारख्या ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या सवलती असतील. गेल्या 'बिग बिलियन डे' प्रमाणेच या दिवाळी सेलमध्येही विविध स्मार्टफोन्सवर सवलतीची अपेक्षा आहे.

स्मार्टफोन्सशिवाय, अ‍ॅक्सेसरीज, टॅब्लेट्स, लॅपटॉप्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरही ग्राहक मोठ्या प्रमाणात बचत करू शकतील. चार्जर, डेटा केबल्स यांसारख्या अ‍ॅक्सेसरीजवर खास डील्स या सेलमध्ये उपलब्ध असतील.

दरम्यान, Amazon सुद्धा 'दिवाळी स्पेशल सेल' आयोजित करत आहे, ज्यामध्ये Samsung, Realme, OnePlus, iQOO, आणि Apple या ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या सवलती दिल्या जात आहेत. Amazon च्या सेलमध्येही ग्राहकांना बँक डिस्काउंट्सचा फायदा घेता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup Final: न्यूझीलंडच्या पोरींनी जिंकला वर्ल्ड कप ! दक्षिण आफ्रिका ५ महिन्यात दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, कामगारांवर गोळीबार, 3 मजुरांचा मृत्यू तर 2 जखमी

विधानसभेसाठी भाजपची यादी जाहीर, देवेंद्र फडणविसांना पुन्हा संधी, प्रतिक्रिया देत म्हणाले...

Vidhansabha Election : समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन! कपिल पाटलांचा खर्गेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

KL Rahul ची कसोटीमधून निवृत्ती? 'त्या' व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, खराब फॉर्ममुळे निर्णय घेतल्याचा दावा

SCROLL FOR NEXT