iPhone 13 Sakal
विज्ञान-तंत्र

iPhone Offer: आयफोन खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण! लेटेस्ट मॉडेल चक्क निम्म्या किंमतीत खरेदीची संधी

ई-कॉमर्स साइट Flipkart वर iPhone 13 मॉडेल स्वस्तात उपलब्ध आहे. फोनला बँक, एक्सचेंज ऑफरसह खरेदी करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Offer On iPhone 13: आयफोन खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. परंतु, किंमतीमुळे अनेकजण खरेदी करणे टाळतात. तुम्हाला देखील आयफोन खरेदी करायचा असल्यास चांगली संधी आहे. iPhone 13 आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत उपलब्ध आहे. आयफोन १४ च्या लाँचिंगनंतर या मॉडेलच्या किंमतीत कपात झाली आहे.

ई-कॉमर्स साइट Flipkart वर iPhone 13 मॉडेल स्वस्तात उपलब्ध आहे. आयफोनच्या या मॉडेलवर मिळणाऱ्या डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

iPhone 13 वर बंपर डिस्काउंट

Flipkart वर iPhone 13 फक्त ६२,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या फोनची मूळ किंमत ६९,९०० रुपये असून, यावर ६,९०१ रुपये डिस्काउंट मिळेल. तसेच, कोटक बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रांजॅक्शनवर अतिरिक्त १ हजार रुपये डिस्काउंट दिले जात आहे.

यावर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. फोनवर १७,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास आयफोन फक्त ४५ हजार रुपयात तुमचा होईल. आयफोन १३ मॉडेल सहा वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे.

iPhone 13 चे फीचर्स

Flipkart Big Billion Days Sale मध्ये या स्मार्टफोनवर हजारो रुपये डिस्काउंट उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफरशिवाय तुम्ही फोनला ५० हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. फोनमध्ये ६.१ इंच Super Retina XDR डिस्प्ले दिला आहे. तर फोटोग्राफी १२ मेगापिक्सल + १२ मेगापिक्सल ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला १२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT