flipkart grand gadget days sale offers 
विज्ञान-तंत्र

Flipkart Sale : कॅमेरा, स्मार्टवॉचसह अनेक प्रोडक्ट मिळतायत स्वस्तात

सकाळ डिजिटल टीम

Flipkart Grand Gadget Days : फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल 2022 नंतर, आता ग्रँड गॅझेट डेज सेल सध्या सुरु आहे. हा सेल 26 जानेवारीपर्यंत चालणार असून या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

सेल मध्ये डिस्काउंटमध्ये उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रॉनिक्सबद्दल बोलायचे तर त्यात डिजिटल कॅमेरा, स्मार्टवॉच, ट्रू वायरलेस स्टिरिओ (TWS) इअरबड्स, लॅपटॉप, मॉनिटर, प्रोजेक्टर, गेमिंग हेडसेट, माउस, कीबोर्ड, हेडफोन, स्पीकर आणि स्टोरेज डिव्हाइस असे अनेक प्रोडक्ट्स स्वस्तात खेरेदी करता येणार आहेत. इतकेच नाही तर तुम्हाला या सेलमध्ये विविध बँकांवर अतिरिक्त डिस्काउंट, कॅशबॅक आणि नो-कॉस्ट ईएमआय सारख्या बँक ऑफर देखील मिळतील.

फ्लिपकार्ट ग्रँड गॅझेट डेज सेलच्या फ्लिपकार्ट पेजद्वारे, ट्रू वायरलेस स्टिरिओ (TWS) इयरफोन्स 799 रुपयांपासून खरेदी करता येतील अशी घोषणा करण्यात आली आहे. फायर-बोल्ट टॉकची किंमत 4,999 रुपये आहे, पण ते केवळ 2,999 रुपयांना विकत घेता येईल. याशिवाय, तुम्ही सेलमध्ये 3,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत कॅमेरा देखील खरेदी करू शकता. Dell लॅपटॉपवर 30% पर्यंत सूट देण्यात येत आहे. तुम्ही नथिंग इअर 1 TWS हे 5,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. गेमर्ससाठी फ्लिपकार्ट सेल मध्ये Onikuma गेमिंग हेडसेट 899 रुपये आणि HP माउस आणि कीबोर्ड कॉम्बो 199 रुपयांपासून सुरू होते.

फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला प्रीमियम इलेक्ट्रॉनिक्सवर देखील बंपर सूट मिळेल. तुम्हाला 64 GB स्टोरेजसह Apple iPad (9th Gen) या सेलमध्ये 30,990 रुपयांत खरेदी करता येईल. Samsung Galaxy Tab A7 Wi-Fi i व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे, परंतु सध्या तुम्ही Flipkart वर 15,999 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्हाला Apple AirPods 10,999 रुपयांमध्ये आणि Google Nest Mini (2nd Gen) 2,720 रुपयां मध्ये खरेदी करता येईल.

यासोबतच Reliance Digital India सेलही 26 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या सेलदरम्यान तुम्ही स्मार्टफोन, टीव्ही, होम अप्लायन्सेस आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोठ्या सवलतींसह खरेदी करू शकता. या सेलमध्ये तुम्हाला अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT