Manage All Your Bill Payments on the Flipkart App esakal
विज्ञान-तंत्र

Flipkart Online Payments : आता कोणतही ऑनलाईन बिल भरा फ्लिपकार्टवरुन; कंपनीने आणली नवी सुविधा, गुगल अन् फोनपेला देणार टक्कर?

Saisimran Ghashi

Flipkart : आनलाईन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेला फ्लिपकार्ट आता फक्त शॉपिंग पुरतेच मर्यादित राहिले नाही तर बिल आणि रिचार्ज करण्याची सुविधाही देत आहे. फ्लिपकार्टने त्यांच्या अॅपवर पाच नवीन रिचार्ज आणि बिल पेमेंट पर्याय समाविष्ट केले आहेत.

या नवीन सेवांमध्ये FASTag रिचार्ज, DTH रिचार्ज, लँडलाइन बिल पेमेंट, ब्रॉडबँड पेमेंट आणि मोबाईल पोस्टपेड बिल पेमेंट यांचा समावेश आहे. आधीपासून असलेल्या इलेक्ट्रिक आणि मोबाईल प्रीपेड रिचार्जच्या सोबत आता या नवीन सोयींमुळे फ्लिपकार्ट एक-स्टॉप शॉपिंग आणि बिल पेमेंट डेस्टिनेशन बनले आहे.

या नवीन सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी फ्लिपकार्ट UPI वापरून ट्रान्सॅक्शन केल्यावर ग्राहकांना सुपरकॉइन्स द्वारे 10% पर्यंत सूट देत आहे. या मर्यादित काळाच्या ऑफरमुळे फ्लिपकार्टवर बिल भरणे आणखी फायद्याचे होणार आहे.

फ्लिपकार्टवर पेमेंट्स आणि सुपरकॉइन्सचे वाईस प्रेसिडेंट गौरव अरोरा यांनी सांगितले की, "उत्पादने खरेदी करण्यापासून ते डिजिटल पेमेंटची आवश्यकता पूर्ण करण्यापर्यंत, या वाढीव वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांसाठी वन-स्टॉप डेस्टिनेशन तयार झाले आहे."

ग्राहकांना सहजतेने बिल भरण्याचा अनुभव, वेळेवर सूचना मिळणे आणि निवडलेल्या बिलर्सच्या बिल रकमेची माहिती मिळण्यासाठी फ्लिपकार्ट बिलडेस्कसोबत भागीदारी करत आहे.

फ्लिपकार्ट अलीकडेच त्यांची य UPI सेवा सुरू केली आहे, जी रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय देते. ग्राहकांना सुपरकॉइन्स आणि कॅशबॅक द्वारे रिवॉर्ड मिळवता येतात, तसेच एक-क्लिक आणि जलद पेमेंट सुविधांचा लाभ घेता येतो. ही सेवा ग्राहकांना ऑनलाइन शॉपिंग करत असो वा बिल भरत असो, सर्वसाठी डिजिटल पेमेंटचा अनुभव आणखी सुधारते.

या नवीन सेवांसह, फ्लिपकार्ट ग्राहकांना चांगला, कार्यक्षम आणि फायदेशीर अनुभव देण्यासाठी सतत काहीतर नावीन्यपूर्ण आणत आहे.गेल्या महिन्यातच त्यांनी फ्लिपकार्टवरुन १५ मिनिटात कोणतीही वस्तु पोहोचवण्याची सुविधा लॉंच करण्याची देखील घोषणा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT