Discount on Oppo F21 Pro: नवीन वर्षात कमी किंमतीत महागडा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असल्यास तुमच्याकडे चांगली संधी आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून तुम्ही Oppo F21 Pro फोनला खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. ६४ मेगापिक्सल कॅमेरा आणि ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणाऱ्या या फोनला फक्त ९९९ रुपयात खरेदी करता येईल. ओप्पोच्या या फोनवर मिळणाऱ्या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Oppo F21 Pro वर मिळेल बंपर डिस्काउंट
Oppo F21 Pro स्मार्टफोनची मूळ किंमत २७,९९९ रुपये आहे. परंतु, डिस्काउंटनंतर फ्लिपकार्टवर हा फोन फक्त २०,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. फोनवर २० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास फोन फक्त ९९९ रुपयात तुमचा होईल. मात्र, लक्षात घ्या की फोनवरील एक्सचेंज ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर निर्भर आहे.
Oppo F21 Pro चे फीचर्स
Oppo F21 Pro मध्ये ६.४३ इंच एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. डिस्प्ले ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट १८० हर्ट्ज टच सँपलिंग रेटसह येतो. फोनमध्ये ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. यात ५ जीबी व्हर्च्यूअल रॅमचा सपोर्ट देखील देखील मिळेल. अशाप्रकारे, रॅमला १३ जीबीपर्यंत वाढवू शकता.
फोन स्नॅपड्रॅगन ६८० चिपसेटसह येतो. यात फोटोग्राफीसाठी रियरला एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट दिला आहे. यात ६४ मेगापिक्सल प्रायमरी लेंस, २ मेगापिक्सल डेप्थ लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो लेंसचा समावेश आहे. तर सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.
यात पॉवर बॅकअपसाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फोन अँड्राइड १२ वर आधारित ColorOS १२.१ वर काम करतो. यात कनेक्टिव्हिटीसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि वाय-फाय मिळेल.
हेही वाचा: New Rules 2023: WhatsApp ते ऑनलाइन पेमेंट... आजपासून बदलणार 'हे' नियम, त्वरित घ्या जाणून
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.