Follow these steps and make your learning license at home
नागपूर : गाडी चालवताना प्रत्येकाजवळ लायसन्स असणे अनिवार्य आहे. विशेष करून तरुण मुलामुलींकडे लायसन्स असणे गरजेचे आहे. मात्र आजकाल फार कमी वयात गाडी मिळाल्यामुळे बऱ्याच तरुण मुलं मुलींकडे लायसन्स नसते. त्यात आरटीओची लायसन्स देण्याची पद्धत फारच किचकट असल्यामुळे बरेच लोक लायसन्स काढण्याचा कंटाळा करतात. ज्या व्यक्तींना गाड्या चालवायच्या आहेत मात्र त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन नाही त्यांच्यासाठी एक नामी संधी चालुन आली आहे. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट मार्फत घर बसल्या लर्निंग लायसन साठी अपलाय कसे करावे हे सांगणार आहोत.
- ड्रायव्हिंग चे लर्निंग लायसन काढण्यासाठी तुमच्या ब्लड ग्रुप चा रिपोर्ट, तुमचा पासपोर्ट साईज फोटो, जन्मदाखला आणि दहावीचे सर्टिफिकेट महत्त्वाचे असते.
- याव्यतिरिक्त तुमच्याकडे आधार कार्ड, वोटर आयडी, रेशनिंग कार्ड, इलेक्ट्रिसिटी किंवा पाण्याचे बिल यांपैकी कोणतेही एक कागदपत्र असणे आवश्यक आहे.
- लर्निंग लायसन काढणे आधी तुम्ही तुमच्या राज्याच्या आरटीओची वेबसाईट ओपन करा.
- यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर नियम व अटी दिलेल्या असतील त्या वाचून कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर अजून एक नवीन पेज उघडेल या पेजवर सबमिट या ऑप्शन वर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर लायसन च्या दृष्टिकोनातून आवश्यक असे पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला आरटीओ ऑफिस पासून ते तुमचे नाव, ब्लड ग्रुप, तुमच्या घराचा पत्ता, तुमचे जन्मस्थळ, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ओळखीसाठी तुमच्या शरीरावरील एखादी खूण यांसारखी माहिती विचारली जाईल.
- त्यानंतर तुम्ही कुठल्या गाडीसाठी लायसन तयार करून घेऊ इच्छिता असे विचारण्यात येईल.
- यानंतर, अर्ज फी सबमिट करा आणि अर्ज क्रमांक नोंद करून ठेवा.
- यानंतर तुम्हाला लायसन साठी च्या परीक्षेसाठी तारीख मिळेल आणि यात तुम्ही यशस्वी झाल्यास तुमचे लर्निंग लायसन तयार होईल. पूर्ण शिकल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसनसाठी अर्ज करावा लागेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.