विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या (Science And Technology) मदतीनं जगाने आज अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्याचं दिसतंय. ऑस्ट्रेलियातील अर्धांगवायू झालेल्या एका व्यक्तीने पहिल्यांदाच हात न वापरता, न बोलता आणि अगदी शरीराच्या कुठल्याच अवयवाची हालचाल न करता एक संदेश मेसेज लिहून, ट्विटरवर शेअर (Tweet) केला आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
फिलीप ओ'कीफे (Philip O’Keefe) असे या अर्धांगवायू झालेल्या रुग्णाचे नाव असून तो ६२ वर्षांचा आहे. त्याने ट्विट केले, “जगाला नमस्कार! छोटं ट्विट, मोठं यश." यासोबतच फिलिप ओ'कीफे यांनी 'पेपरक्लिप मेंदूमध्ये (Brain Implant) रोपण केल्याबद्दल' डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सिंक्रोन कंपनीने त्यांच्या मेंदूमध्ये मायक्रोचिप बसवून त्यांच्या विचारांना शब्दात बदलण्याची शक्ती दिली आहे.
फिलिपच्या मेंदूमध्ये बसवलेली मायक्रोचिप मेंदूचे सिग्नल वाचते. मग त्या सिग्नल्सचे विश्लेषण करते आणि मेंदूच्या सूचनांचा अर्थ लावून त्यांचे शब्दांमध्ये रूपांतर करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.