Ford Layoffs : नवीन वर्षात आयटी क्षेत्रात मोठी नोकरकपात सुरु आहे. फेसबुक, ट्विटर, गुगल, अॅमेझॉनने अनेकांना नारळ दिला आहे. आता ऑटो सेक्टरमध्ये देखील नोकरकपात करण्यात येत आहे. यापूर्वी, Amazon आणि Meta सारख्या अनेक दिग्गज कंपन्यांनी त्यांच्या कंपनीत मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली आहे. दरम्यान अमेरिकन कार उत्पादक फोर्डने देखील नोकरकपातीची घोषणा केली आहे.
फोर्ड मोटर कंपनी ३ हजार २०० कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. यासोबतच कंपनीने काही प्रोडक्ट डेव्हलपमेंटचे काम अमेरिकेत हलवण्याची योजना आखली आहे. ही कंपनी मुळ अमेरीकेची आहे. इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि या दिशेने काम करण्यासाठी फोर्डने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
आयजी मेटल युनियनने सोमवारी वर्क कौन्सिलच्या बैठकीनंतर यावर आपली भूमिका मांडली. या नोकरकपातीचा युरोपमधील अंदाजे ६५% विकास नोकऱ्यांवर परिणाम होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच या विरुद्ध ते लढा देतील असे देखील स्पष्ट केले.
फोर्ड कंपनी युरोपमध्ये सुमारे ४५ हजार लोकांना रोजगार देते. कंपनीची आता ७ नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स आणण्याची तयारी करत आहे. जर्मनी आणि तुर्कस्तानमध्ये इलेक्ट्रिक मॉडेल्सचे उत्पादन करण्यात येऊ शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.