Elon Musk Sued by Twitter Executives eSakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk Sued : इलॉन मस्कने बुडवले 'एक्स'च्या माजी अधिकाऱ्यांचे 130 बिलियन डॉलर्स? पराग अग्रवालसह इतरांनी खेचलं कोर्टात

Parag Agrawal Sues Elon Musk : मस्कला आम्हाला कोणतीही भरपाई द्यायची नव्हती. इतर लोकांचे पैसे अडकवून ठेवायचे आणि त्यांना कोर्टाचे दरवाजे ठोठावण्यास भाग पाडायच, हीच त्याची कार्यपद्धती आहे.

Sudesh

Elon Musk Sued by Former twitter executives : एक्स, म्हणजेच ट्विटरच्या काही माजी अधिकाऱ्यांनी इलॉन मस्कला कोर्टात खेचलं आहे. ट्विटर खरेदी केल्यानंतर इलॉन मस्कने या अधिकाऱ्यांना कामावरुन कमी केलं होतं. मात्र, भरपाई म्हणून देणाऱ्या रकमेपैकी तब्बल 130 मिलियन डॉलर्स मस्कने अजूनही आपल्याला दिले नसल्याचं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. यामध्ये कंपनीचे माजी सीईओ पराग अग्रवाल यांचाही समावेश आहे.

सोमवारी कॅलिफोर्निया फेडरल कोर्टात या अधिकाऱ्यांनी खटला दाखल केला आहे. "इलॉन मस्क आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना शांत बसवण्यासाठी पैसा आणि अधिकारांचा गैरवापर करतो. तो कोणतेही बिल देखील भरत नाही. आपल्यावर नियम लागू होत नाहीत असं त्याला वाटतं." असं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. (Former twitter executives sue Elon Musk)

कुणाचं किती देणं बाकी?

एक्सचे माजी सीईओ पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांनी आपले 57.4 मिलियन डॉलर्स मिळाले नसल्याचं म्हटलं आहे. तर माजी सीएफओ नेड सेगल (Ned Segal) यांनी आपले 44.5 मिलियन डॉलर्स मिळाले नसल्याचं म्हटलं. सोबतच, माजी चीफ लीगल ऑफिसर विजया गड्डे (Vijaya Gadde), माजी जनरल काऊन्सेल सेन एजेट (Sean Edgett) यांनीही मस्कने आपले पैसे दिले नसल्याचं म्हटलं आहे.

मस्कने घेतला बदला?

"मस्कने आधी ट्विटर खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर तो डीलमधून (Elon Musk Twitter Deal) बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी ट्विटरच्या स्टेकहोल्डर्सची बाजू आम्ही लावून धरली होती. त्यामुळे मस्कला नाईलाजाने ट्विटर खरेदी करावेच लागले. यानंतर त्याने आम्हाला काहीही कारण न देता काढून टाकलं. तसंच, आपला निर्णय योग्य ठरवण्यासाठी स्वतःच्याच इतर कंपन्यांमधील लोक ट्विटरमध्ये आणून बसवले." असं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

"मस्कला आम्हाला कोणतीही भरपाई द्यायची नव्हती. इतर लोकांचे पैसे अडकवून ठेवायचे आणि त्यांना कोर्टाचे दरवाजे ठोठावण्यास भाग पाडायच, हीच त्याची (Elon Musk) कार्यपद्धती आहे. आम्ही ट्विटरच्या भल्यासाठी लढत होतो, याचाच बदला इलॉनने आम्हाला काढून घेतला." असा आरोप या अधिकाऱ्यांनी केला.

मस्कविरोधात खटलेच खटले

दुसऱ्या एका प्रकरणात अग्रवाल, गड्डे आणि सेगल यांनी ट्विटरवरील त्यांच्या पूर्वीच्या भूमिकांशी संबंधित खटले, तपास आणि काँग्रेसच्या चौकशीच्या खर्चाची परतफेड करण्यासाठी मस्कवर खटला दाखल केला आहे. तर अशाच प्रकारचे दावे करणारा आणखी एक खटला एक्सच्या सहा माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखल केला आहे.

यासोबतच, मस्कने खरेदी केल्यानंतर एक्सच्या कित्येक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आलं होतं. त्यांना भरपाई म्हणून किमान 500 मिलियन डॉलर्स देण्याबाबत एक खटला दाखल आहे. (Lawsuits against Elon Musk)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT