अॅपलची आयफोन-15 ही सीरीज नुकतीच लाँच झाली आहे. या सीरीजच्या माध्यमातून स्मार्टफोन मार्केटमध्ये मुसंडी मारण्याचा कंपनीचा उद्देश्य आहे. मात्र, यातच फ्रान्स सरकारने अॅपलला मोठा धक्का दिला आहे. या देशामध्ये iPhone 12 फोनच्या विक्रीवर बंदी जाहीर करण्यात आली आहे.
अॅपलचा iPhone 12 हा मोबाईल मोठ्या प्रमाणात रेडिएशन उत्सर्जित करत असल्याचं फ्रान्सने म्हटलं आहे. त्यामुळेच, हा निर्णय घेण्यात आला आहे. अॅपलने मात्र हे आरोप फेटाळले असून, या फोनने आधीच फ्रान्समध्ये रेडिएशन टेस्ट पास केली होती असं कंपनीने म्हटलं आहे.
एखाद्या डिव्हाईसमधून बाहेर पडणारं किती रेडिएशन आपल्या शरीरात शोषलं जाऊ शकतं, याला त्याला SAR व्हॅल्यू म्हणतात. प्रत्येक देशाने आपली ठराविक SAR व्हॅल्यू निश्चित केली आहे. फ्रान्सच्या एजन्सी ऑफ नॅशनल फ्रीक्वेन्सीने iPhone 12 मधून येणारी रेडिएशन ही EUने निर्धारित केलेल्या SAR व्हॅल्यूपेक्षा अधिक असल्याचं म्हटलं आहे.
या रेडिएशनमुळे कोणत्याही यूजरला धोका निर्माण झाल्याचं अद्याप समोर आलं नाही. ग्लोबल SAR व्हॅल्यू आणि युरोपियन युनियनने निश्चत केलेली SAR व्हॅल्यू यात फरक आहे. फ्रान्सच्या आरोपांनंतर आता EU मधील इतर देशांनीही रेडिएशन लिमिट तपासणी सुरू केली आहे.
सोबतच जगभरातील इतर देशांतील नागरिकांनी देखील ग्लोबल SAR व्हॅल्यूबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. ग्लोबल व्हॅल्यू ही खरोखरच सुरक्षित आहे का, असा सवाल लोक उपस्थित करत आहेत.
तुमच्या स्मार्टफोनची SAR व्हॅल्यू किती आहे हे तुम्ही लगेच तपासू शकता. भारत आणि अमेरिकेच्या सरकारांनी निश्चित केलेली SAR व्हॅल्यू ही 1.6 W/kg आहे. तुमच्या स्मार्टफोनचं SAR मूल्य तपासण्यासाठी, फोनवरील डायल पॅड उघडा. डायल पॅडवर *#07# टाइप करा. यानंतर कॉल बटण दाबा. त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला फोनची SAR व्हॅल्यू दिसेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.