Free up Gmail storage space
Free up Gmail storage space esakal
विज्ञान-तंत्र

Free up Gmail storage space: तुमचंही Gmail स्टोरेज फुल झालंय ? मग असं रिकामं करा स्टोरेज

सकाळ ऑनलाईन टीम

आजच्या डिजीटलायझेनच्या जगात जीमेल हे अत्यंत महत्वाचं टूल आहे. सरकारी असो वा खाजगी जवळपास सर्वच कार्यालयात वापरात येणारं जीमेल हे सर्वात महत्वाचं टूल आहे. विद्यार्थ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचं या काळाच जीमेल अकाऊंट असतंच. आणि अनेक अॅप्लिकेशन्स आपल्या जीमेल अकाऊंटशी यावेळी लिंक्ड असतात. त्यामुळे दिवसभऱ्यात किती तरी मेल आपल्याला येत असतात. आणि दररोजचा विचार केला तर असे शेकडो मेल जमा होतात. आपल्या मोबाईलमध्ये जीमेलसाठी मोजकाच स्टोरेज असल्याने अनेकांना त्यामुळे अडचणी येतात.या सोप्या टीप्सने तुम्ही स्टोरेज रिकामा करू शकता. (Free up Gmail storage space with easy tips)

जेव्हा तुमचा स्टोरेज १५ जीबीला (GB) पोहोचतो तेव्हा तुम्हाला फुल स्टोरेज अशी नोटीफिकेशन येते. तेव्हा तुम्हाला स्टोरेज रिकामं करायचं असतं. मात्र माहितीच्या अभावी अनेकांना स्टोरेज (storage) रिकामं करण्यात अडचणी येतात. चला तर जाणून घेऊया जीमेलचं स्टोरेज रिकामं करण्याच्या काही टीप्स.

कसं रिकामं करायचं जीमेल स्टोरेज

याच्या दोन पद्धती आहेत

१. पहिली पद्धत म्हणजे तुम्ही मोठे म्हणजेच लार्ज मेल (large mail) डिलीट करून टाका.

२. दुसरी पद्धत म्हणजे निरर्थक मेल अनसर्बस्क्राईब (Unsubscribe) करा.

लार्ज मेल असे डिलीट करा

जीमेल स्टोरेज स्पेस फ्री करण्यासाठी तुम्हाला ही ट्रीक कामी येईल.

१. तुम्ही जीमेलला जाऊन 'has:attachment large:10M' सर्च करा.

२.हे सर्च केल्यानंतर १० जीबी (10 Gb) किंवा त्यापेक्षा मोठे असणारे सगळे मेल तुम्हाला दिसतील.

३. यातील तुम्हाच्या कामाचे नसलेले मेल सिलेक्ट करून तुम्ही डिलीटवर क्लिक करा.

४. त्यानंतर ट्रॅश फोल्डरवर जा आणि एम्टी ट्रॅश बटनवर क्लिक करा.

तसेच दररोज येणारे अनुपयोगी मेल तुम्ही त्या मेल मध्ये जाऊन अनसबस्क्राईब करा. त्यानंत पॉपअप स्क्रिनवर दिसणाऱ्या अनसबस्क्राईब परत क्लिक करा. यामुळे तुमचं स्टोरेज फुल होणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: "गैरसमजातून गुन्हे दाखल केले," सर्व गुन्हे मागे घेत रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांची क्लीन चीट

Dhirubhai Ambani Story: धीरूभाई अंबानींनी माती विकून असे कमावले होते पैसे, IPO आधी 3 वेळा बदलले होते रिलायन्सचे नाव

Hathras Stampede: "देव आपल्याला..." हाथरस दुर्घटनेप्रकरणी भोले बाबा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर; पाहा व्हिडिओ

Team India Victory Parade : कोहली, जडेजाचा मुंबई पोलिसांना सॅल्यूट! मिरवणुकीचे व्यवस्थापन अव्वल दर्जाचे

Maharashtra Congress: काँग्रेस धमाका करण्याच्या तयारीत? घेतला शरद पवार, उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढवणारा निर्णय

SCROLL FOR NEXT