अँड्रॉइड युजर्संसाठी एक गुड न्यूज आहे. लवकर अँड्रॉइड फोनमध्येही आयफोनप्रमाणेच एक भन्नाट फीचर उपलब्ध होणार आहे. अॅपल आयफोन (Apple Iphone) ज्या प्रकारे अॅपल आयडीशी कनेक्ट असते, अगदी तसेच फीचर अँड्राइड फोनमध्येही उपलब्ध केले जाऊ शकते. हे फीचर अँड्राइड (android phone features) फोन युजर्संना त्यांचे अन्य डिव्हाइसही लिंक करण्यास मदत करेल. एका रिपोर्टनुसार गुगल (Google) लवकरच सर्व युजर्संना संबंधित devices ना लिंक करण्यास परवानगी देऊ शकते, जे एकाच Google खात्याच्या मदतीने साइन इन केले जाते.
हे डिव्हाइस लिंक करण्याचे फीचर अँड्रॉइड फोन युजर्संसाठी कॉल स्विचिंग यासारखे फीचर अॅक्सेस करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देईल. कॉल स्विचिंग फीचर युजर्संना कॉलसाठी लिंक केल्या गेलेल्या डिव्हाइसमध्येच स्विच करण्याची परवानगी देते. अँड्रॉइडमधील हे डिव्हाइस लिंक करण्याचे फीचर युजर्संना इंटरनेट शेअरिंगमध्येही मदत करू शकते.
एका रिपोर्टनुसार, अँड्रॉइड फोनमध्ये सेटिंग मेनूमध्ये ‘Link Your Devices’ असे एक नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल.
गुगल प्ले सर्व्हिसेसच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असेही म्हटलं जात आहे.
Google Play Store अॅप्लिकेशन उपलब्ध असणाऱ्या अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये या फीचरची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाऊ शकते.
Googleचे नवीन फीचर Apple ID प्रमाणे काम करेल. ज्या प्रकारे अॅपल आयडीशी सर्व अॅपल डिव्हाइस कनेक्ट केले जातात, त्याच प्रकारे हे फीचर सर्व Android डिव्हाइसेसला एकत्रित कनेक्ट करेल.
रिपोर्टनुसार Googleने असे सुचवले आहे की, कॉल कंटिन्युटी फीचर इतर अँड्रॉइड फोनवरही उपलब्ध करून दिले जाईल. उदाहरणार्थ जर वापरकर्त्यांकडे दोन अँड्रॉइड फोन असतील तर हे फीचर उपलब्ध झाल्यानंतर संबंधित युजर दोन्ही फोनवर एका वेळेस एकच कॉल Dial करू शकतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.