Geely Panda Car Sakal
विज्ञान-तंत्र

Geely Panda Car: Tata Nano पेक्षा पिटुकल्या कारची होणार बाजारात एंट्री, जाणून घ्या किती असेल किंमत

चीनची कार निर्माता कंपनी Geely लवकरच आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारला लाँच करणार आहे. ही कार टाटा नॅनोपेक्षा लहान असेल.

सकाळ डिजिटल टीम

Upcoming Electric Car: काहीवर्षांपूर्वी टाटा मोटर्सने आपली छोटी कार नॅनोला लाँच केले होते. कमी किंमत आणि आकारामुळे या कारची विशेष चर्चा झाली होती. आता टाटा नॅनोपेक्षाही छोट्या कारची बाजारात एंट्री होणार आहे. सध्या जगभरात इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढली आहे. अनेक कंपन्या हटके फीचर्ससह येणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सला सादर करत आहेत. याच लिस्टमध्ये टाटा नॅनो सारख्या पिटुकल्या Electric Car चा समावेश होणार आहे. या अपकमिंग कारचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

ही पिटुकली इलेक्ट्रिक कार लवकरच चीनमध्ये लाँच होणार आहे. या कारचा फोटो समोर आल्यानंतर लोक याची तुलना टाटा नॅनोशी करत आहे. या कारला दमदार बॅटरी पॅकअसह लाँच केले जाईल.

नॅनोप्रमाणे दिसणाऱ्या या छोट्या इलेक्ट्रिक कारचे नाव Geely Panda आहे. या कारला चीनी कंपनी Geely ने डिझाइन केले आहे. कंपनी या कारला लवकरच चीनच्या बाजारात सादर करणार आहे. नवीन ईव्ही कार टाटा नॅनोपेक्षा लहान आहे. परंतु, कंपनी या कारला चीनच्या बाहेर सादर करणार की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Geely Panda चे काही स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. रिपोर्टनुसार, कारची लांबी १२०.६ इंच आणि उंची ७९.३ इंच आहे. तर रुंदी ५९.९ इंच आणि व्हीलबेस ७९.३ इंच आहे. कारच्या इलेक्ट्रिक मोटरची क्षमता ३०kW पर्यंत आहे. याची रेंज २०० ते ३०० किमी असण्याची शक्यता आहे.

किंमतीबद्दल सांगायचे तर Geely Panda कार ३० ते ४० लाख रुपयांच्या बजेटमध्ये येऊ शकते. लाँचिंगनंतरच या पिटुकल्या कारच्या अधिकृत स्पेसिफिकेशन्स, टॉप स्पीड आणि रेंजबाबत माहिती समजू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT