Tech Accord Elections 2024 eSakal
विज्ञान-तंत्र

Tech Accord Elections 2024 : 'निवडणुकीत होऊ देणार नाही एआयचा गैरवापर'; गुगल, अमेझॉन, मेटासह 20 मोठ्या टेक कंपन्यांचा करार!

Munich Tech Accord : "एआयचा वापर करून लोकांची दिशाभूल करणारा कंटेंट तयार केल्यामुळे निवडणुकीच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो." असं या करारामध्ये म्हटलं आहे.

Sudesh

Tech Accord to Combat Deceptive Use of AI in 2024 Election : यंदाचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. केवळ भारतातच नाही, तर जगातील 50 हून अधिक देशांमध्ये यावर्षी सार्वत्रिक निवडणुका (General Elections) पार पडत आहेत. या निवडणुकांमध्ये आणि एकूणच एआयचा गैरवापर केला जाऊ नये यासाठी जगभरातील टेक कंपन्या एकत्र आल्या आहेत. म्युनिच सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये या कंपन्यांनी याबाबत करारावर स्वाक्षरी केली.

यावर्षी होणाऱ्या 60व्या म्युनिच सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये (Munich Security Conference) एआय हा प्रमुख मुद्दा ठरला. यावेळी गुगल, अमेझॉन, मेटा, ओपन एआय, टिकटॉक, आयबीएम, स्नॅपचॅट, एक्स, मायक्रोसॉफ्ट आणि टेक क्षेत्रातील इतरही मोठ्या कंपन्या उपस्थित होत्या. या कंपन्यांनी निवडणुकांच्या काळात एआयचा वापर करुन चुकीची माहिती पसरवली जाणार नाही याबाबत खबरदारी घेण्याचं वचन दिलं. एआयचा गैरवापर टाळणे आणि त्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे यासाठी कंपन्यांनी एक करार केला.

"टेक अकॉर्ड टू कॉम्बॅट डिसेप्टिव्ह यूज ऑफ एआय इन 2024 इलेक्शन" या करारावर 20 मोठ्या टेक कंपन्यांनी स्वाक्षरी केली. मायक्रोसॉफ्टचे प्रेसिडेंट ब्रॅड स्मिथ यांनी याबाबत घोषणा केली. "एआयचा वापर करून लोकांची दिशाभूल करणारा कंटेंट तयार केल्यामुळे निवडणुकीच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो." असं या करारामध्ये म्हटलं आहे.

डीपफेकचा मोठा धोका

आजकाल एआय आणि डीपफेकमुळे (Deepfake) खोटी आणि चुकीची माहिती पसरण्याचं प्रमाण वाढत आहे. एखाद्या नेत्याचा खोटा व्हिडिओ, ऑडिओ, फोटो अशा गोष्टी व्हायरल करून, मतदारांची दिशाभूल करणं सोपं झालं आहे. यामुळेच सर्व कंपन्यांनी एकत्र येत याबाबत पावलं उचलण्याचं निश्चित केलं आहे. यामध्ये व्हॉइस-क्लोन स्टार्टअप इलेव्हन लॅब्स, चिप डिझायनर कंपनी आर्म होल्डिंग्स, McAfee आणि ट्रेंड मायक्रो या सिक्युरिटी कंपन्या देखील सहभागी आहेत. (Tech Companies Against Deepfake)

सर्वांनी एकत्र येण्याची गरज

मेटाचे (Meta) ग्लोबल अफेअर्सचे प्रमुख निक क्लेग यावेळी म्हणाले की एआयचा गैरवापर टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं हा एकच उपाय आहे. "एकटी टेक कंपनी, एक सरकार किंवा एखादी संस्था याबाबत स्वतः काहीही करू शकत नाही" असं ते म्हणाले.

बॅन नाही, डिटेक्शन..

डीपफेक किंवा एआयच्या चुकीच्या वापराविरोधात या कंपन्या एकत्र आल्या असल्या, तरी यावर बॅन लागू करावा असं त्यांचं मत नाही. त्याऐवजी एआयच्या माध्यमातून तयार केलेला कंटेंट ओळखण्यात यावा यावर कंपन्या भर देणार आहेत. तसंच, अशा प्रकारचा कंटेंट शेअर करताना काही कारवाई किंवा निर्बंध लावता येतात का याबाबत कंपन्या विचार करणार आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास, मेटाने आपल्या फेसबुकवर एआय जनरेटेड इमेज ओळखता याव्यात यासाठी नवीन फीचर लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. (AI Content Detection)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT