Gmail युजर्स सावधान! Omicron च्या नावावर होत आहे आर्थिक फसवणूक esakal
विज्ञान-तंत्र

Gmail युजर्स सावधान! Omicron च्या नावावर होत आहे आर्थिक फसवणूक

Gmail युजर्स सावधान! Omicron च्या नावावर होत आहे आर्थिक फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

सायबर क्रिमिनल्स Gmail वापरकर्त्यांना ओमिक्रॉनच्या नावाने ई-मेल पाठवून फसवण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोविड 19 (Covid-19) च्या व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे (Omicron) संपूर्ण जगात भीती पसरली आहे. बऱ्याच देशांमध्ये त्याचा प्रसार वेगाने होत आहे. आता याचा फायदा हॅकर्स घेत आहेत. सायबर क्रिमिनल्स (Cyber Criminals) Gmail वापरकर्त्यांना ओमिक्रॉनच्या नावाने ई-मेल (E Mail) पाठवून फसवण्याचा (Fraud) प्रयत्न करत आहेत. यूके (UK) आधारित सुरक्षा फर्म इंडिव्हिज्युअल प्रोटेक्‍शन सोल्यूशन्स (Individual Protection Solutions - IPS) ने वापरकर्त्यांना Gmail फिशिंग हल्ल्याच्या नवीन सिरीजबद्दल चेतावणी दिली आहे. (Gmail users are getting financial fraud in the name of Omicron)

फसवणुकीची नवीन पद्धत

Gmail वर अनेक वापरकर्त्यांना बनावट ई-मेल पाठवला जात आहे. त्यात असा दावा केला जात आहे, की नवीन पीसीआर चाचणी ओमिक्रॉन व्हेरिएंटला ओळखेल, जेणेकरून लोक सुरक्षितपणे प्रवास करू शकतील आणि सेल्फ आयसोलेशनची गरज भासणार नाही. ओमिक्रॉन पीसीआर चाचणीसाठी विलंब न करता खालील लिंकवर क्‍लिक करा, असे ई-मेलमध्ये म्हटले आहे. लिंकवर क्‍लिक करणे म्हणजे तुम्ही पुरते फसणार हे नक्की.

तुम्ही लिंकवर क्‍लिक करताच, तेथे तुम्हाला नाव, पत्ता आणि बॅंक खाते क्रमांक यांसारखे तपशील देण्यास सांगण्यात येईल. वरवर पाहता सध्या कोरोना विषाणूच्या (Corona Virus) नवीन व्हेरिएंटसाठी अशी कोणतीही चाचणी नाही किंवा असा कोणताही अधिकृत ई-मेल पाठविला जात नाही. तुमचे वैयक्तिक आणि बॅंक तपशील देऊन, तुम्ही फसवणूक करणाऱ्याला तुमचे बॅंक खाते रिकामे करण्याची संधीच देता. ज्यांना चाचणी लवकर बुक करायची आहे ते लोक या सापळ्यात सहज अडकू शकतात.

या गोष्टी ठेवा लक्षात...

  • असे ईमेल आरोग्य संस्थेकडून पाठवले जात नाहीत.

  • तरीही तुम्हाला असे ईमेल आले तर ईमेल पाठवणाऱ्याचा पत्ता तपासा

  • ईमेलमधील कोणत्याही लिंकवर क्‍लिक करू नका.

  • तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती कधीही शेअर करू नका.

  • नवीन व्हेरिएंटसाठी अधिकृतपणे अशी कोणतीही चाचणी नाही.

  • असे ईमेल त्वरित डिलीट करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT