Mansoon Special Device esakal
विज्ञान-तंत्र

घरात ओलसर वास येतोय ? आता मोबाईलच्या एका क्लिकवर येईल सेंटसारखा सुगंध

बाजारात असं नवं प्रोडक्ट लाँच केल्या गेलंय ज्यामुळे मोबाईलच्या एका क्लिकवर तुमच्या घरातील ओलसरपणाचा वास तुम्ही घालवू शकता.

सकाळ डिजिटल टीम

भारतात सगळीकडे मान्सून आला असून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाळा म्हटलं की सगळीकडे पाऊस आणि त्यामुळे ओलावा असतो. पावसाळ्यात प्रत्येकाची घरं ओली असतात. त्यामुळे घरात एक विचित्र वास येतो. ओलसर वास आल्याने अनेकजण यावर तात्पुरता उपाय करत अगरबत्ती किंवा धूप अगरबत्ती लावतात. मात्र त्याच्या धूरानेही अनेकांना त्रास होतो. मात्र बाजारात असं नवं प्रोडक्ट लाँच केल्या गेलंय ज्यामुळे मोबाईलच्या एका क्लिकवर तुमच्या घरातील ओलसरपणाचा वास तुम्ही घालवू शकता. (Mansoon Special Device- Godrej aer Smart Matic)

होय, गोद्रेज कंपनीने 'एयर स्मार्ट मॅटिक डिवाईस' लाँच केलंय जे मोबाईलने कंट्रोल केल्या जाणार आहे. यात गोद्रेजच्या स्मार्ट मॅटिक बॉक्समध्ये एक डिवाईस असणार आहे. याच्या आत एक स्प्रे असेल. विशेष म्हणजे हा स्प्रे २२०० वेळा स्प्रे केला जाऊ शकतो असा कंपनीने दावा केलाय. डिवाईसच्या आतील भागात दोन बॅटरी आणि सेल असतील. यासोबतच ऑन बॅटरी व्यतिरिक्त तीन ऑप्शन्स मिळतील. त्यात तुम्ही हा स्प्रे तुम्हाला किती वेळासाठी करायचा आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. मात्र हे डिवाईस जर का तुम्ही मोबाईलला कनेक्ट केलं तर तुम्हाला फक्त ऑन ऑफ करायची गरज पडेल.

कसं काम करतं हे डिवाइस ?

Godrej aer Smart Matic ला घराच्या कोणत्याही कोपऱ्यातून स्मार्ट स्विच ऑन ऑफच्या मदतीने कंट्रोल केल्या जाऊ शकतं. 'Godrej aer Smart Matic' अॅप यूजरला डिवाइसला कंट्रोल करण्याची अनुमती देतो. तुम्हाला मिनिटाला,तासाला किंवा सेकंदाला कंट्रोल करण्याचीही फॅसिलिटी तुम्हाला मिळेल.

गोद्रेज एयर स्मार्ट मॅटिक डिवाइस एकूण सहा फ्रॅग्रंसमध्ये उपलब्ध असेल. वायलेट वॅली ब्लूम, पेटल क्रश, फ्रेश लश ग्रीन आणि कूल सर्फ ब्लू सोबत प्रीमियम फ्रॅग्रंससह उपलब्ध असतील. स्मार्ट गोद्रेज एयर स्मार्ट मॅटिक अॅप अॅड्रॉइड आणि आयओएस डिवाइसवर उपलब्ध आहेत. या डिवाइसची तुम्ही ऑनलाइन खरेदीही करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT