गुगल सध्या एआयवर जोमाने काम करत आहे. आपल्या सर्च इंजिनमध्ये एआयच्या मदतीने गुगलने कित्येक नवीन फीचर्स अॅड केले आहेत. यामुळे यूजर्सना एखादी गोष्ट सर्च करताना अधिक चांगल्या प्रकारे सर्च रिझल्ट मिळणार आहेत.
नुकतेच गुगलने आपल्या सर्च ऑप्शनसाठी तीन नवे फीचर्स लाँच केले आहेत. यामुळे यूजर्सना अधिक वेगाने आणि अधिक चांगल्या प्रकारे सर्च रिझल्ट मिळणार आहेत.
गुगलने एक महत्त्वाचं फीचर आपल्या सर्च रिझल्टमध्ये अॅड केलं आहे. या फीचरमुळे एखाद्या लिंकसोबत यूजर्सना ती कोणत्या दिवशी प्रकाशित झाली याची तारीखही दिसणार आहे. त्यामुळे यूजर्स अधिक नवीन आणि अपडेटेड आर्टिकल शोधू शकतील.
गुगलवर एखादी गोष्ट सर्च केल्यानंतर ओव्हरव्ह्यू सेक्शनमध्ये तुम्हाला हवी असणारी नेमकी माहिती मिळते. याठिकाणी आतापर्यंत केवळ टेक्स्ट किंवा इमेज देण्यात येत होती. मात्र, आता याठिकाणी तुम्हाला व्हिडिओही पहायला मिळणार आहेत. हे व्हिडिओ आपोआप प्ले देखील होतील.
उदाहरण द्यायचं झाल्यास, तुम्ही जर गुगलवर एखाद्या योगासनाबाबत सर्च केलं. तर त्याची केवळ माहितीच नाही, तर ते आसन सादर करतानाचा व्हिडिओही ओव्हरव्ह्यूमध्ये दिसणार आहे.
गुगलने आपल्या SGE मध्ये मोठी सुधारणा केली आहे. यामुळे आता एखादी गोष्ट सर्च केल्यानंतर अधिक जलद गतीने ओव्हरव्ह्यू रिझल्ट्स लोड होणार आहेत. आधीच्या तुलनेत निम्मा वेळ हे लोड होण्यासाठी लागणार आहे.
गुगलने हे फीचर्स सध्या अशा यूजर्ससाठी उपलब्ध करुन दिले आहेत, ज्यांनी गुगल लॅबचं सबस्क्रिप्शन घेतलं आहे. येत्या काळामध्ये हे फीचर कंपनी कदाचित सगळ्या यूजर्ससाठी उपलब्ध करून देऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.