गूगलचे CEO सुंदर पिचाई म्हणाले, जिओफोन नेक्‍स्ट 'या' दिवशी होईल लॉंच! 
विज्ञान-तंत्र

गूगलचे CEO पिचाई म्हणाले, जिओफोन नेक्‍स्ट 'या' दिवशी होईल लॉंच!

गूगलचे CEO सुंदर पिचाई म्हणाले, जिओफोन नेक्‍स्ट "या' दिवशी होईल लॉंच!

श्रीनिवास दुध्याल

परवडणारा स्मार्टफोन JioPhone Next च्या लॉंच तारखेबाबत अनेक दिवसांपासून सस्पेन्स सुरू आहे.

परवडणारा स्मार्टफोन JioPhone Next च्या लॉंचिंग तारखेबाबत अनेक दिवसांपासून सस्पेन्स सुरू आहे. मात्र, आता गूगलचे (Google) सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) ड्रीम प्रोजेक्‍ट JioPhone Next स्मार्टफोनच्या लॉंच डेटची पुष्टी केली आहे. सुंदर पिचाई यांनी सांगितले की, JioPhone Next स्मार्टफोन दिवाळीपर्यंत (Diwali) भारतात लॉंच केला जाईल. ते म्हणाले की, JioPhone Next लोकलाइज्ड क्षमतांनी सुसज्ज असेल. सुंदर पिचाई म्हणाले, की मेड इन इंडियाला अफोर्डेबल स्मार्टफोन बनवण्यासाठी गूगलने रिलायन्ससोबत काम केले आहे.

पिचाई म्हणाले की, भारत कोविड-19 मुळे खूप प्रभावित झाला आहे. परंतु या काळात फीचर फोनवरून स्मार्टफोनकडे जाणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अशा परिस्थितीत फीचर फोनवरून स्मार्टफोनकडे जाणाऱ्या ग्राहकांसाठी JioPhone Next हा एक उत्तम स्मार्टफोन ठरणार आहे. हे प्रथमच इंटरनेट वापरकर्त्यांसाठी शक्‍यतांचे नवीन द्वार उघडण्यासाठी कार्य करेल. अशा परिस्थितीत JioPhone Next चे लॉंचिंग मैलाचा दगड ठरणार आहे. हे भारतात डिजिटल परिवर्तनाचे साक्षीदार असेल. याचा परिणाम भारतात पुढील तीन ते चार वर्षांपर्यंत असेल. JioPhone Next साठी केवळ भारतच नाही तर आशिया पॅसिफिक ही मोठी बाजारपेठ असेल.

JioPhone Next ची अपेक्षित किंमत

JioPhone Next ची किंमत 5000 रुपयांपेक्षा कमी असेल. मीडिया रिपोर्टनुसार, JioPhone Next 3,499 रुपये किमतीमध्ये लॉंच केला जाईल.

JioPhone चा संभाव्य तपशील

JioPhone Next स्मार्टफोन ड्युअल सीमसह 3GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोअरेजसह येईल. JioPhone Next स्मार्टफोन Snapdragon 215 प्रोसेसर सपोर्टसह येईल. तसेच गूगलने बनवलेली Pragat OS चा वापर यात करण्यात आला आहे. हे 4 Cortex-A53 Cores आणि इंटिग्रेटेड Adreno 306 GPU सपोर्टसह येईल. JioPhone Next स्मार्टफोनमध्ये HD+ डिस्प्ले दिला जाईल. हे 320 DPI (डॉट्‌स प्रतिइंच) स्क्रीन डेन्सिटीला सपोर्ट करेल. फोनला 5.5 इंच स्क्रीन मिळेल. त्याचा ऑस्पेक्‍ट रेशो 18:9 असेल. JioPhone Next स्मार्टफोन 2500mAh बॅटरीसह येईल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 8MP रंट कॅमेरा आणि 13MP रियर कॅमेरा दिला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT