नवी दिल्ली- सोमवारी गूगलच्या वापरकर्त्याना सर्व्हेर डाऊनचा सामना करावा लागला आहे. वापरकर्त्यांनी जीमेल, सर्ज इंजिन, युट्यूब आणि इतर सेवांचा लाभ घेण्यास अडचण येत असल्याची तक्रार केली आहे. मागे Windows चे सर्व्हेर डाऊन झाले होते. आता गूगलची देखील तशीच अवस्था झाली आहे.
मागे १२ ऑगस्ट रोजी विडोंजची सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे वापरकर्त्यांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं होतं. अनेकांच्या सेवेवर यामुळे परिणाम पडला होता. आता गूगलबाबतही तसाच प्रकार घडला आहे. सोमवारी अनेक वापरकऱ्यांनी गूगलची सेवा वापरत असताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या आहे. 'हिंदूस्तान टाईम्स'ने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे.
डाऊनडिटेक्टर ही वेबसाईट ऑनलाईन येणाऱ्या समस्यांकडे लक्ष ठेवून असते. वेबसाईटला रात्री नऊ वाजल्यानंतर याबाबतच्या तक्रारी मिळू लागल्या होत्या. नेमक्या कशामुळे ही समस्या जाणवू लागली आहे याबाबत कारण अस्पष्ट आहे. कारण, सध्या अमेरिकेमध्ये सकाळ होत असून त्याठिकाणी लोकांनी काम करण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे याबाबतच्या तक्रारी वाढू शकतात.
गूगल डाऊन झाले असल्याने नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. गूगल का डाऊन आहे हे पाहण्यासाठी मी गूगल करून पाहिलं अन् मला उत्तर मिळालं, असं म्हणत एका युझरने फिरकी घेतली. डाऊनडिटेक्टरने सांगितल्यानुसार, अमेरिकेत लॉस वेगस आणि न्यूयॉर्क सिटीमध्ये सर्वात जास्त तक्रारी मिळाल्या आहेत. इतर भागामध्ये वापरकर्त्यांना थोड्या कमी प्रमाणात अडचणी आल्या आहेत.
जवळपास ५७ टक्के समस्या या सर्च इंजिनसंबंधी आहेत, तर ३१ टक्के समस्या या वेबसाईट संबंधी आहेत. ११ टक्के समस्या या गुगल ड्राईव्हसंबंधी आहेत. यूएस, यूके, युरोप, आशिया, साऊथ अमेरिकामध्ये वाररकर्त्यांना या अडचणी जाणवत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.