Google For India 2024 Annual Event esakal
विज्ञान-तंत्र

Google For India 2024 : दिवाळीआधी भारतासाठी गुगलकडून AIची अनोखी भेट; वार्षिक कार्यक्रमात मोठ्या घोषणांसह काय खास असणार? पाहा

Saisimran Ghashi

Google For India 2024 : दिवाळी आधी भारतासाठी आनंदाची बातमी! गुगल 3 ऑक्टोबर रोजी आपला वार्षिक "गुगल फॉर इंडिया 2024" कार्यक्रम आयोजित करणार आहे. या कार्यक्रमात भारताच्या वाढत्या डिजिटल गरजांवर आधारित गुगलच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उपक्रमांची माहिती मिळणार आहे. 2015 पासून सुरु असलेल्या या कार्यक्रमात भारतात इंटरनेटचा प्रसार, डिजिटल साक्षरता आणि तंत्रज्ञान-केंद्रित उपाय यांवर गुगल करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली जाते.

भारताच्या डिजिटल गरजांवर भर

गुगल फॉर इंडिया कार्यक्रमात दरवर्षी भारताच्या वेगळ्या आव्हानांवर मात करण्यासाठी गुगलच्या नाविन्यपूर्ण सेवा, उत्पादने आणि कार्यक्रम जाहीर केले जातात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चाळी असलेल्या साधनांपासून स्थानिक व्यवसायांना मदत करणाऱ्या उपक्रमांपर्यंत, भारताच्या वाढत्या डिजिटल जगतावर लक्ष केंद्रित करून गुगल भारताच्या डिजिटल परिवर्तनात सक्षम करण्यासाठी बांधील असलेला रस्ता या कार्यक्रमात दिसून येईल. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना Android, Google Assistant आणि भारताच्या वाढत्या डिजिटल जगतासाठी विशेष डिझाइन केलेली नवीन साधने यांच्याशी संबंधित अनेक आकर्षक घोषणा ऐकायला मिळण्याची शक्यता आहे.

2024 मध्ये अपेक्षित घोषणा

2024 च्या स्पष्ट घोषणा अजून प्रतीक्षाच आहेत, परंतु गेल्या वर्षीच्या घोषणांवरून अंदाज लावता येतो की, या कार्यक्रमात डिजिटल पेमेंट्स, AI आणि स्थानिक उत्पादनावर अधिक भर दिला जाईल. 2023 मध्ये गुगलेने मेक इन इंडिया उपक्रमाचा भाग म्हणून भारतात Pixel फोन बनवण्याची योजना उघड केली होती. या वर्षी Pixel 9 स्मार्टफोनची स्थानिक उत्पादन आणि त्यांची भारतात उपलब्धता यांची घोषणा गुगल करू शकते.

भारतासाठी AI-आधारित नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान

गेल्या वर्षीच्या कार्यक्रमात AI ची महत्वाची भूमिका होती. त्यावेळी गुगल सर्च भारतीय लोकांना सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त वैशिष्ट्ये आणत असल्याचे सांगण्यात आले होते. या वर्षी गुगल त्याच्या AI क्षमतांचा विस्तार करेल अशी अपेक्षा आहे. विशेषत: स्थानिक भाषांमध्ये आणि छोट्या व्यवसायांसाठी उपयुक्त साधनांवर भर दिला जाईल आणि संपूर्ण देशात डिजिटल समावेशीकरण वाढवण्याचे आपले ध्येय गुगल पुढे चालू ठेवेल.

Google Pay सह आर्थिक सेवांचा विस्तार

2023 मध्ये गुगल पेद्वारे वापरकर्त्यांना आधीपासून मंजूर केलेल्या क्रेडिट लाइन्सची सुविधा देऊन आर्थिक समावेशीकरणा क्षेत्रात मोठी झेप घेतली. या उपक्रमाचा आणखी विस्तार करण्याची घोषणा गुगल 2024 मध्ये करू शकते. यामुळे भारतातील दुर्लक्षित जनतेला आर्थिक सेवांची उत्तम उपलब्धता होण्यास मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Kolhapur Visit : राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द! नेमकं कारण काय?

PAK vs SL मॅचमध्ये वाद, आधी आऊट, मग नॉट आऊट... रुमालामुळे निर्णयच बदलला! काय घडलं?

Gold Prices: लवकरच सोने 85 हजारांवर पोहचणार! गुंतवणूकदार होणार मालामाल; किती मिळणार रिटर्न?

Amitabh Bachchan : जेव्हा अमिताभ दिवसाला 200 सिगारेट्स ओढायचे आणि होतं या गोष्टीचं जबरदस्त व्यसन ; "मी तेव्हा हाताला..."

Cabinet Meeting : आता ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करणे पडणार महागात! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT