Google Essentials App to Bring Photos, Messages, and More Together esakal
विज्ञान-तंत्र

Google Essentials App : गुगलच्या 'Essentials' ॲपची जगभर चर्चा; नेमकं काय आहे खास? कसं वापराल,जाणून घ्या

Saisimran Ghashi

Google New App Launch : टेक्नॉलॉजी जगतात एक आनंदाची आनंदाची बातमी आहे. गुगल लवकरच एक नवीन ॲप लाँच करणार आहे ज्यामुळे आता तुमच्या सर्व आवडत्या Google सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. 'Essentials' नावाच्या या ॲपमध्ये Photos, Nearby, Drive, Messages अशा महत्वाच्या सर्व सेवा एकत्रित केल्या जाणार आहेत. यामुळे आता तुम्हाला वेगवेगळ्या ॲप्समध्ये तुमचा डेटा सेव्ह करून ठेवायची गरज राहणार नाही.या एका ॲपमध्येच तुमच सगळ काम होणार जाईल.

Windows आणि लॅपटॉप वापरकर्त्यांसाठी खास

एका रिपोर्टनुसार, हे ॲप विशेषत: Windows आणि लॅपटॉप वापरकर्त्यांसाठी बनवण्यात आले आहे. Essentials अनेक Google सेवा एकत्रित करून तुमची कामे सोपी करेल. आता तुम्हाला वेगवेगळ्या ॲप्समध्ये डेटासाठी उलटापालट करण्याची गरज नाही. सर्व आवश्यक Google सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने तुमचा अनुभव आनंददायी होईल.

Play Store मध्ये सहज उपलब्ध

Essentials ची आणखी एक खासियत म्हणजे त्यामध्ये Google Play Store चीही जोड मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही थेट Essentials ॲपमधूनच इतर ॲप्स डाउनलोड करू शकाल. हा ॲप HP च्या Envy, Pavilion आणि Omen या सारख्या डिव्‍हाइसेसमध्ये प्री-इन्स्टॉल्ड येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या आवडत्या सेवा आणि ॲप्स एकाच ठिकाणी मिळतील.

Essentials ॲप लाँच कधी होणार?

Essentials ची रिलीज डेट अजून Google ने अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, पण या वर्षाच्या अखेरपर्यंत तो लाँच होण्याची शक्यता आहे. गुगल नेहमी नवनवीन गोष्टींचा शोध घेत असतोच, आणि Essentials ॲप त्यांच्या सेवा वापरणाऱ्यांसाठी एक सोपा आणि सुव्यवस्थित अनुभव देणार आहे.हे ॲप सध्या लॅपटॉप आणि विंडोजसाठी उपलब्ध असून मोबाईल वापरकर्त्यांसाठी नसले तरीही भविष्यात ते मोबाईल वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde : "सीएम साहेबांचा दरवाजा बंद ? " मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने चक्क आमदाराला नाकारला प्रवेश !

India Economy : भारत २०३१ पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था; ‘एस अँड पी’चा अहवाल

IND vs BAN 1st Test : मानलं अण्णा! R Ashwin च्या दमदार खेळीने भारताला सावरले, पण आज गणित गंडले, ऑल आऊट झाले

युद्धाच्या नव्या टप्प्याला सुरुवात,इस्राईलचा इशारा; लेबनॉनच्या सीमेवर सैन्याची जुळवाजुळव

१२ चौकार, ३ षटकार! Sanju Samson चे खणखणीत शतक; श्रेयस अय्यरच्या संघाला सावरले

SCROLL FOR NEXT