विज्ञान-तंत्र

Google MusicLM : गुगलने आणलंय भन्नाट टूल; आता टेक्स्टचे होणार संगीतात रुपांतर

तंत्रज्ञानाच्या जगात हा एक नवा शोध मानला जाऊ शकतो.

राहुल शेळके

Google MusicLM : गुगल मधील संशोधकांनी नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) टूल MusicLM विकसित केले आहे. यामध्ये लिहिलेला मजकूर संगीतामध्ये बदलू शकतो.

तंत्रज्ञानाच्या जगात, वापरकर्ते आर्टिफिशियल इंटेलिजेंस रिसर्च कंपनी ओपनएआयच्या चॅटजीपीटीबद्दल खूप उत्सुक आहेत. त्यात गुगलकडून आणखीन एक नवीन टूल तयार करण्यात आले आहे.

अशी कृत्रिम बुद्धिमत्ता गुगलने तयार केली आहे, ज्याच्या मदतीने मजकुराचे संगीतात रूपांतर करता येऊ शकते. तंत्रज्ञानाच्या जगात हा एक नवा शोध मानला जाऊ शकतो.

गुगल ही जनरेटिव्ह एआय टूल्सवर काम करणारी पहिलीच कंपनी नाही. यापूर्वीही असे अनेक प्रयत्न झाले आहेत. रिफ्यूजन, ओपनएआयचा ज्यूकबॉक्स आणि गुगलचा एक ऑडिओएमएल ही काही उदाहरणे आहेत.

म्युझिक एलएमला (MusicLM) 2,80,000 तासांच्या संगीताच्या डेटासेटवर प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे टूल 24 kHz वर संगीत निर्मिती करू शकते. असे गुगलने सांगितले आहे.

रिसर्चनुसार गुगलने या मॉडेलच्या माध्यमातून काही नमुनेही सादर केले आहेत. या नमुन्यांना MusicCaps असे नाव देण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे हा डेटाबेस 5.5k म्युझिक-टेक्स्ट जोड्यांमधून तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा : ...इथं बनतो आपला लाडका तिरंगा

नमुन्यामध्ये कंपनीने 30 सेकंदांपासून ते 5 मिनिटांपर्यंतच्या संगीत क्लिप सादर केल्या आहेत. या संगीत क्लिपचे मजकुरातून संगीतात असे रुपांतर करण्यात आले आहे.

सध्या अनेक वृत्त कंपन्या AI च्या मदतीने त्यांच्या वेबसाईटचा मजकूर आवाजात बदलण्याचे काम करत आहेत.

मात्र, आता गुगल आणखी एक पाऊल पुढे जात आहे आणि मजकूर संगीताच्या स्वरूपात सादर करत आहे. यापूर्वी, एआय आधारित चॅटजीपीटीबद्दल बरीच चर्चा झाली आहे. यामुळे युजर्सना वेगवेगळ्या वेबसाईट सर्च करण्याची गरज नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT