google launches secret ios app to help apple users switch to android  
विज्ञान-तंत्र

गुगलचं सिक्रेट ॲप; iOS वरून अँड्रॉइडवर शिफ्ट होता येईल अगदी सहज

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही आयफोन वापरकर्ते आहात आणि Android वर स्विच करू इच्छिता? मग तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. Google ने iOS साठी एक फ्री ॲप जारी केले आहे जेणेकरुन तुम्हाला iPhone वरून Android डिव्हाइसवर डेटा सहजपणे नेण्यात मदत होईल. स्विच टू अँड्रॉइड ॲप वायरलेस पद्धतीने कार्य करते, म्हणजे तुम्हाला दोन फोन केबलने कनेक्ट करण्याची गरज नाही, अशी माहिती द व्हर्जने दिलेल्या रिपोर्टमध्ये दिली आहे.

“स्विच टू Android ॲप गुगलवरून तुम्हाला तुमचा सर्व महत्त्वाचे डेटा जसेकी फोटो, व्हिडिओ, कॉन्टॅक्ट्स आणि कॅलेंडर इव्हेंट्स नवीन अँड्रॉइड डिव्हाइसवर केबल्सशिवाय ट्रांसफर करण्यासाठी मदत करते असे ॲप स्टोअरवरील ॲपच्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हटले आहे. रिपोर्ट्सनुसार या सूचीमध्ये मेसेजेसचा समावेश नाही, यावरुन फोनमधील मेसेज हे ॲप ते ट्रांसफर करू शकणार नाही असे दिसते. मात्र यामधून वापरकर्त्यांना iMessage बंद करण्याची प्रक्रिया सांगण्यात येईल जेणेकरून तुम्हाला आलेले मेसेज तुमच्यापर्यंत पोहचतील.

9to5Google च्या रिपोर्टनुसार हे एक अनलीस्टेड ॲप आहे आणि iPhone वर ॲप स्टोअर शोधताना तुम्हाला ते सापडणार नाही. तथापि, वापरकर्ते इंटरनेटवरुन ते डाउनलोड करू शकतात. येथे क्लिक करुन देखील तुम्ही ते डाऊनलोड करु शकता.

Apple कंपनी देखील 2015 पासून एक "Move to iOS" नावाचे यासारखेच ॲप ऑफर करते, जे वापरकर्त्यांना Android वरून iPhone वर डेटा ट्रांसफरसाठी मदत करते.

गुगल स्विच टू अँड्रॉइड हे व्यापकपणे लाँच करेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु Apple चे “Move to iOS” ॲप Play Store खूप दिवसांपासून उपलब्ध आहे, त्यामुळे Google ला असा पर्याय विकसीत करायाला कितीतरी उशीर झाला असे म्हणता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT