Google  Sakal
विज्ञान-तंत्र

Google Loss News : गुगलला 100 बिलियन डॉलर्स फटका बसवणारी नेमकी चूक काय?

गुगलच्या बार्ड चॅटबॉटला जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने काय शोधले होते असा प्रश्न विचारण्यात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

Google Loss News : इंटरनेट सर्च फर्म गुगलची मूळ कंपनी Alphabet Inc ला मोठा झटका बसला आहे.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

कंपनीच्या शेअर्सचे बाजार मूल्य एका झटक्यात 100 डॉलर बिलियनने कमी झाले असून, Google च्या मूळ कंपनी अल्फाबेटचे शेअर्स बुधवारी 8 टक्के म्हणजेच अंदाजे 8.59 डॉलर ते 99.05 डॉलरपर्यंत घसरले.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, यापूर्वी 26 ऑक्टोबर रोजी कंपनीचे शेअर्स 8.9 टक्क्यांनी घसरले होते. अल्फाबेट कंपनीचे मार्केट कॅप एका दिवसात 100 बिलियन डॉलरने कमी झाले आहेत.

अलीकडेच, भारतातील अब्जाधीश गौतम अदानी यांच्या समूहावरील हिंडेनबर्ग अहवालानंतर 10 दिवसांत मार्केट कॅप 100 डॉलरने अब्जने कमी झाली.

फक्त एका चुकीमुळे गमावेल 100 अब्ज डॉलर्स

काही काळापूर्वी मायक्रोसॉफ्टने ChatGPT चॅटबॉट सादर केले असून, हे सर्च इंजिनचे नवीन तंत्रज्ञान मानले जात आहे. अशा परिस्थितीत गुगलच्या पॅरेंट कंपनीने ChatGPT ला प्रतिसाद म्हणून चॅटबॉट बार्ड सादर केला आहे. कंपनीने त्याच्या जाहिरातीसाठी ट्विटरवर एक छोटा व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये बार्डने चुकीची माहिती दिली.

बार्ड चॅटबॉटने दिली चुकीची माहिती

गुगलच्या बार्ड चॅटबॉटला जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने काय शोधले होते असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बार्डने बरीच माहिती शेअर केली, मात्र ही माहिती सर्रास चुकीची होती.

बार्डने जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने पहिल्यांदा पृथ्वीच्या सौरमालेबाहेरील ग्रहाचे छायाचित्र घेतले होते, असे उत्तर दिले. मात्र, याच प्रश्नाचे उत्तर नासाकडून वेरी लार्ज टेलीस्कोपने काढल्याचे सांगितले होते.

मायक्रोसॉफ्ट कॉर्प ChatGPT वर अब्जावधींची गुंतवणूक करत आहे. तर दुसरीकडे गुगलही बार्ड चॅटबॉट आणण्याच्या तयारीत असून, लवकरच यातील त्रुटी दूर करून ते लॉन्च केले जाईल असे गुगलने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT