Google Maps' New Update AI Chat, AR Navigation, and Photo-Based Search esakal
विज्ञान-तंत्र

Google Map AI : गुगल मॅपला मिळाला AI चा टच! जाणून घ्या नवीन भन्नाट बदल...

Google Maps : कधीही कुठेही जायचे असेल तर आपण गुगल मॅप वापरतो. ते आपल्याला योग्य लोकेशन देते आणि आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचे आहे ते अगदी सोपे आणि सोईस्कर होते.

Saisimran Ghashi

Artificial Intelligence : गुगल मॅप आपल्या सर्वांचा सोबती बनला आहे. कधीही कुठेही जायचे असेल तर आपण गुगल मॅप वापरतो. ते आपल्याला योग्य लोकेशन देते आणि आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचे आहे ते अगदी सोपे आणि सोईस्कर होते.

नुकतेच Google Maps ने आपल्या मॅप अनुभवात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संवर्धित वास्तवता (AR) चा वापर करून नवे बदल केले आहेत. या नवीन अपडेटमुळे आता तुम्ही Google Maps सोबत बोलून हवी ती माहिती मिळवू शकता.

अपडेटमध्ये नवीन काय?

  • बोलून माहिती मिळवा (Chat with Google Maps): ChatGPT सारख्या सुविधेनुसार, तुम्ही आता Google Mapsशी बोलून जवळपासच्या ठिकाणांबद्दल माहिती विचारू शकता. उदाहरणार्थ, "जवळपास कोणता पार्क आहे?" किंवा "आसपास कोणते हॉस्पिटल आहे?" असे प्रश्न तुम्ही विचारू शकता.

  • वेळेत माहिती (Live View with AR): तुमच्या फोनच्या कॅमेराचा वापर करून, जवळपासच्या ठिकाणांची माहिती (ATM, हॉटेल, पेट्रोल पंप) वाढीव वास्तवतेच्या (Augmented reality) साहाय्याने थेट तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता.

  • फोटोच्या आधारे शोध (Photo-Based Search): ज्यांना शब्दांपेक्षा दृश्य अधिक आवडतात त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. Google Maps मध्ये आता तुम्ही जगातील लाखो लोकांनी टाकलेले फोटो वापरून तुम्हाला हवी ती ठिकाणं शोधू शकता.

  • Lens in Maps: तुमच्या फोनच्या कॅमेऱ्याचा वापर करून जवळपासच्या ATM, बस स्टॉप, किंवा इतर ठिकाणांची माहिती त्वरित मिळवा.

  • AI ची सुचना (AI Recommendations): हवामानात अचानक बदल झाल्यास, घरात राहून मनोरंजनाचे पर्याय शोधण्यासाठी AI तुमची मदत करेल.म्हणजेच जवळपासचे सिनेमा थिएटर किंवा कलाकेंद्र शोधण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

Google Maps आता तुमचा पूर्णपणे AI-चालित गाईड बनला आहे. या नवीन कृत्रिम बुद्धीमत्ता वैशिष्ट्यांच्या साहाय्याने तुम्ही आता गुगल मॅपचा वापर खूप चांगल्या प्रकारे करू शकणार आहात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT