गुगलने आपली गुगल मीट अपडेट करण्याची घोषणा केली आहे. नवीन अपडेट मध्ये वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर नवीन फीचर्स आणि नवीन लुक देखील पाहायला मिळणार आहे. या अपडेटमध्ये डेटा सेव्हरचा एक पर्याय देखील उपलब्ध आहे, जो वापरकर्त्यांना पैसे वाचविण्यात मदत करेल.
नवीन अपडेटमध्ये वापरकर्त्यांना नवीन इंटरफेस, ऑटो झूम, डेटा सेव्हर सारखी फीचर्स दिसतील. यासह वापरकर्त्यांना बॅकग्राऊंड बदलण्याचे फीचर देखील मिळेल. कोरोना महामारीच्या काळात झूम आणि गूगल मीटची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. बर्याच मुले गुगल मीटवर ऑनलाईन क्लासेसही घेत आहेत. घरुन काम करणारे बरेच लोक Google मीटिंगद्वारे बैठकीस उपस्थित राहतात.
कंटेन्ट शेअर करण्यासाठी मिळेल जास्त स्पेस
Google मीटची नवीन डिझाईनमध्ये वापरकर्त्यांना अधिक स्पेस मिळेल जेणेकरून ते आपली कंटेन्ट स्क्रीनवर अधिक चांगल्या प्रकारे शेअर करू शकतील आणि मिटींगमध्ये उपस्थित असलेल्या इतर लोकांना ते अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. हे फीचर्स पुढील महिन्यात उपलब्ध होतील. गूगलमध्ये मल्टीपल पिन सुविधा देण्यात येईल, जेणेकरून वापरकर्ते त्यांच्यावर लक्ष केंद्रित करु शकतील आणि काही महिन्यांत हे फीचर्स प्रसिद्ध होईल.
Google मीट लाइट ऑटोमॅटीक सेट होईल
Google मीट वापरकर्ते कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी बसलेले असतील आणि त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नसेल तर Google मीट आपोआप लाइट आपोआप सेट करेल. गुगल मीट वेबचे हे फीचर येत्या आठवड्यात प्रसिद्ध होईल.
गुगल मीटवर ऑटो-झूम येत आहे
ऑटो-झूम फीचरच्या मदतीने, वापरकर्ते एकमेकांना सहज पाहू शकतील. ऑटो फोकस झूम मीट दरम्यान व्यक्ती हलत असल्यास आपल्या चेहऱ्यावर फोकस करेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, येत्या आठवड्यात गुगल वर्कस्पेसमध्ये या फीचर्सचे अपडेट देण्यात येणार आहे, त्यासाठी वापरकर्त्याला त्याची सबस्क्रिप्शन खरेदी करावी लागेल.
मोबाइल वापरकर्त्यांनाही मिळेल लाभ
डेटा सेव्हर लवकरच गुगल मीटिंगमध्ये देखील देण्यात येईळ, ज्याच्या मदतीने मोबाइल नेटवर्क दरम्यान कॉल करतांना डेटाची मर्यादा निश्चित केली जाऊ शकते आणि यामुळे डेटा बचत होईल. Google चे हे फीचर्स भारत, इंडोनेशिया आणि ब्राझीलसाठी उपयोगी ठरतील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.