google new feature for android app witch let you delete last 15 minutes of search history  
विज्ञान-तंत्र

गुगलचं अँड्रॉइडसाठी नवं फीचर; 15 मिनिटांची सर्च हिस्ट्री होईल गायब

सकाळ डिजिटल टीम

गुगल आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन फीचर्स सादर करत असते. यावेळीही कंपनी असेच काही खास फीचर घैऊन येत आहे, ज्याचा अनेकांना फायदा होऊ शकतो. Google चं हे फीचर वापरुन तुम्ही तुमची शेवटच्या 15-मिनिटांची सर्च हिस्टरी डिलीट करु शकाल. टेक जायंट Google च्या Android App मध्ये हे फीचर देण्यात येणार आहे. Google ने अलीकडे iOS App वर हा पर्याय दिलाय.

XDA डेव्हलपरचे माजी एडिटर-इन-चीफ मिशाल रहमान म्हणाले की, त्यांना या फीचरबद्दल माहिती देण्यात आली आहे. अँड्रॉईड अॅपमध्ये हे फीचर येण्यासाठी थोडा उशीर झाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. Google ने प्रथम मे मध्ये Google I/O वर या फीचरची घोषणा केली आणि जुलैमध्ये ते Google च्या iOS अॅपवर आले. त्यावेळी, Google ने सांगितले होते की ते 2021 मध्ये अॅपच्या अँड्रॉइड प्रकारात देखील येईल, परंतु काही कारणास्तव कंपनीची ती डेडलाईन चुकली.

हे फीचर डेस्कटॉपवर आणण्याचा कंपनीचा विचार आहे की नाही हे देखील स्पष्ट करण्यात आले नाही, असेही ते म्हणाले. मेच्या घोषणेनंतर, ते कोणत्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल हे सांगण्यात आले नाही. मात्र, जुलैमध्ये गुगलने फक्त हे फीचर iOS आणि अँड्रॉइड अॅप्सवर येईल असे सांगितले होते.

गुगलच्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्सची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षी 11 मे 2022 रोजी Google I/O परिषद आयोजित केली जात आहे. ही दोन दिवसीय परिषद असून ती 12 मे पर्यंत चालणार आहे. यामध्ये विविध सत्रे होणार आहेत. प्रत्येक सत्रात सॉफ्टवेअरशी संबंधित समस्यांवर चर्चा केली जाईल. प्रश्न आणि उत्तरे देखील असू शकतात. याशिवाय काही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: अजितदादांचा आनंद द्विगणित! पुण्यातील आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? 'या' तीन नावांची चर्चा

IND vs AUS : Yashasvi Jaiswal च्या दीडशतकी खेळीने रचला नवा विक्रम ; दिग्गजांमध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय

Adampur Firing : भरदिवसा दोन टोळ्यांमध्ये गोळीबारचा थरार; एकमेकांवर झाडल्या गोळ्या, आदमापुरात नेमकं काय घडलं?

Girish Mahajan : गिरीश महाजन ठरले पुन्हा संकट मोचक; बंडखोरी थोपविण्यात यश

Nashik East Assembly Constituency : बालेकिल्ला शाबूत, ढिकलेच ‘पहिलवान’

SCROLL FOR NEXT