GPay Discontinuation in the US: Google Wallet Takes Over esakal
विज्ञान-तंत्र

Gpay Shutting Down: असं काय झालं की कंपनीने घेतला Gpay बंद करण्याचा निर्णय; प्लेस्टोअरवरून ऍप गायब

Gpay App Latest Update: गुगल पे ला रिप्लेस करणार हे ऍप, या देशांमध्ये होणार GooglePay बंद

Saisimran Ghashi

Gpay App : आपल्या दैनंदिन व्यवहारांचा सोबती म्हणजे गुगल पे.पण विचार करा जर गुगल पे बंद झालं तर? कल्पनाच करता येत नाहीये ना. पण हे झालंय गुगल पे काल पासून बंद झालेले आहे.आता ऍपदेखील प्लेस्टोर वरून हटवण्यात येत आहे. यूएसमध्ये Gpay बंद करण्यात आले आहे.

आता नक्कीच तुमच्या मनात हा विचार येईल की कंपनीने असं केलं तरी का? आता Gpay ऐवजी पर्यायी मार्ग कोणता तर युएसमध्ये P2P पेमेंट डिस्कन्टिन्यू झाल्यामुळे Gpay बंद करण्यात आले आहे.

GPay वापरकर्ते जगभरात पसरलेले आहेत आणि त्यांची संख्या भारत आणि सिंगापूरमध्ये खूप जास्त आहे. आता भारत आणि सिंगापूरमध्ये काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाचे उत्तर गुगलने दिले आहे. 

GPay ॲप अमेरिकेत का बंद झाले?

Google ने यूएस मधील GPay सुविधा बंद केल्या आहेत. हे मोबाईल ऍप्लिकेशन Google Play Store वरून काढून टाकण्यात आले आहे. ज्या मोबाईल डिव्हाइसेसवर GPay आधीपासून इंस्टॉल केले आहे तेथेही ते काम करणार नाही. त्याच्या जागी गुगल वॉलेट ॲप रिप्लेस करण्यात आले आहे. नावाप्रमाणेच ते wallet आहे. लोक त्यांच्या बँक खात्यातून वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करतील आणि वॉलेटमधून कोणत्याही प्रकारचे पेमेंट करू शकतील.

गुगल वॉलेट ॲपद्वारे खरेदी करता येते,असे सांगण्यात आले आहे की GPay स्वयंचलितपणे Google Wallet ॲपमध्ये रूपांतरित होईल. वापरकर्त्यांना काहीही करण्याची आवश्यकता नाही. पेमेंट ॲप आणि वॉलेट ॲपमध्ये मोठा फरक आहे. पेमेंट ॲपद्वारे तुम्ही कोणतेही बिल भरू शकता आणि तुमच्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता परंतु वॉलेट ॲपमध्ये ही सुविधा नाही.

GPay भारतात आणि सिंगापूरमध्येही बंद होईल का?

अमेरिकेतील सेवा बंद केल्यानंतर भारतात आणि सिंगापूरमध्येही GPay बंद होणार का, असा प्रश्न वापरकर्त्यांना पडला आहे. गुगलने स्पष्ट केले आहे की ते फक्त युनायटेड स्टेट्समध्ये gpay सेवा बंद करत आहे. GPay भारत आणि सिंगापूरसह इतर देशांमध्ये सेवा बंद करण्याची त्यांची अद्याप योजना नाही.

Google ने आपल्या स्पष्टीकरणात लिहिले आहे की "Google युनायटेड स्टेट्समध्ये GPay ॲप बंद करत आहे, परंतु भारत आणि सिंगापूर सारख्या इतर बाजारपेठेतील gpay काम करत राहतील. भारत आणि सिंगापूरमध्ये Google Pay ॲप वापरणाऱ्या लाखो लोकांनी चिंता करण्याची करण्याची गरज नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT