Google Pixel 7a Launch in India esakal
विज्ञान-तंत्र

Google Pixel 7a ची भारतात एंट्री! पहिल्या सेलमध्ये मिळणार थेट 4 हजारांची सूट

Google Pixel 7a Launch in India: Pixel 7a गुगलच्या A-सिरीज अंतर्गत सादर करण्यात आला आहे. या फोनची किंमत काय आहे आणि फीचर्स काय आहेत याविषयी जाणून घेऊयात.

सकाळ डिजिटल टीम

Google Pixel 7a भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाला आहे. हा फोन Google I/O 2023 डेव्हलपर इव्हेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. Pixel 7a गुगलच्या A-सिरीज अंतर्गत सादर करण्यात आला आहे. या फोनची किंमत काय आहे आणि फीचर्स काय आहेत याविषयी जाणून घेऊयात.

भारतात Pixel 7a ची किंमत 43,999 रुपये आहे. ही त्याच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत आहे. 11 मे पासून हा फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लॉन्चमुळे युजर्सना खूप साऱ्या ऑफर मिळणार आहेत. जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 4,000 रुपयांची त्वरित सूट मिळू शकते. यानंतर फोनची किंमत 39,999 रुपये होईल. हा फोन चारकोल, स्नो आणि सी कलरमध्ये उपलब्ध असेल.

Google Pixel 7a चे फीचर्स

Google Pixel 7a मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.1-इंच फुल-एचडी + OLED डिस्प्ले आहे. याच्या स्क्रीनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. हे HDR सपोर्टसह येते. फोनचा फिंगरप्रिंट स्कॅनर डिस्प्लेमध्ये एम्बेड केलेला आहे.

हा फोन Tensor G2 SoC ने सुसज्ज आहे. यात Titan M2 सिक्युरिटी को-प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, Bluetooth v5.3 आणि NFC सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. (Technology)

फोनची बॅटरी 4385mAh आहे. Google ने Pixel 7a ला पहिल्यांदाच वायरलेस चार्जिंग दिले आहे. Pixel 7a मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 64-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आहे.

त्याचा दुसरा सेन्सर अल्ट्रा वाइड-एंगलसह येतो, ज्यामध्ये 13-मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा सेन्सर आहे. हा फोन Android 13 आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भीषण हल्ल्याचा तीव्र निषेध- आदित्य ठाकरे

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT