Google Pixel 8 Pro Features eSakal
विज्ञान-तंत्र

Google Pixel : गुगलच्या नव्या पिक्सेल 8 आणि 8 प्रोचे फीचर्स लीक; किंमतही आली समोर - रिपोर्ट

Google Pixel 8 Pro : गुगल पिक्सेल 8 आणि 8 Pro या दोन्ही फोनमध्ये 50 MP प्रायमरी कॅमेरा मिळेल.

Sudesh

अ‍ॅपलच्या आयफोन-15 सीरीजनंतर आता गुगलही आपली नवी स्मार्टफोन सीरीज लाँच करण्याच्या तयारीत आहे. Google Pixel सीरीजमधील Pixel 8 आणि Pixel 8 Pro हे दोन फोन लाँचसाठी सज्ज झाले आहेत. मात्र 4 ऑक्टोबरला होणाऱ्या ग्लोबल लाँचपूर्वीच या फोनचे फीचर्स आणि किंमत लीक झाली आहे.

91 मोबाईल्स या वेबसाईटने हे फीचर्स लीक केले आहेत. गुगल पिक्सल 8 प्रो या स्मार्टफोनमध्ये टेन्सॉर G3 SoC आणि M2 सिक्युरिटी चिप असणार आहे. यामध्ये 12GB LPDDR5X रॅम आणि 1TB पर्यंत UFC 3.1 स्टोरेज देण्यात येऊ शकतं. विशेष म्हणजे, हे व्हेरियंट केवळ अमेरिकेत उपलब्ध असेल आणि इतर ठिकाणी 512 GB स्टोरेज व्हेरियंट मिळेल, असं म्हटलं जात आहे. गुगलच्या Pixel 8 या स्मार्टफोनमध्येही हेच पर्याय उपलब्ध असतील.

गुगल पिक्सेल 8 मध्ये 6.2 इंच FHD+ OLED डिस्प्ले मिळेल, जो 2000 Nits ब्राईटनेस देईल. याचा रिफ्रेश रेट 60 ते 120 हर्ट्झ एवढा असेल. प्रो व्हर्जनमध्ये 6.7 इंच QHD+LTPO OLED डिस्प्ले मिळेल. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसंच याची ब्राईटनेस 2,400 Nits असेल.

कसा असेल कॅमेरा?

गुगल पिक्सेल 8 आणि 8 Pro या दोन्ही फोनमध्ये 50 MP प्रायमरी कॅमेरा मिळेल. प्रो व्हर्जनमध्ये 48 MP अल्ट्रावाईड सेन्सर, आणि 48 MP टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. यामध्ये 30x सुपर रेस झूम आणि OIS हे फीचर मिळतील. तसंच, या फोनमध्ये 10.5 MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

हे दोन्ही फोनमध्ये स्टॉक अँड्रॉईड 14 ओएस मिळेल. तसेच दोन्हीमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास प्रोटेक्शन मिळणार आहे. या दोन्ही मॉडेलना IP68 डस्ट अँड वॉटर रेझिस्टन्स रेटिंग मिळाली आहे. वायफाय 7 आणि ब्लूटूथ 5.3 असे फीचर्सही दोन्ही फोनमध्ये मिळतील. पिक्सेल 8 मॉडेलमध्ये 4,575 mAh बॅटरी मिळेल, तर 8 प्रोमध्ये 5,050 mAh क्षमतेची बॅटरी मिळेल. दोन्ही फोन 30W वायर्ड आणि 23W वायरसेल चार्जिंग सपोर्ट करतील.

किती असेल किंमत?

मिळालेल्या माहितीनुसार, गुगल पिक्सेल 8 ची अमेरिकेत किंमत ही 699 डॉलर्स (सुमारे 58,100 रुपये) एवढी असेल. तर, गुगल पिक्सेल 8 प्रो या स्मार्टफोनची किंमत अमेरिकेत 899 डॉलर्स (सुमारे 74,700 रुपये) एवढी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT