Google's Pixel 9 Series Launch  esakal
विज्ञान-तंत्र

Pixel 9 Series Launch : भारतात लवकरच गुगल पिक्सेल 9 सीरिजची एंट्री! एकदम खास स्मार्टफोन्सचं फोर इन वन फीचर काय?

Saisimran Ghashi

Google Pixel Smartphones : टेक्नो जगतात धमाका करणारी गुगलची पिक्सेल 9 सीरिज लवकरच भारतात येत आहे. 13 ऑगस्टला अमेरिकेत होणार्‍या लाँचनंतर, भारतात ही सीरिज 14 ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे. या सीरिजमध्ये किमान चार वेगवेगळे स्मार्टफोन्स येण्याची शक्यता आहे, त्यात फोल्डेबल फोनही असू शकतो.

फोर इन वन : पिक्सेल 9

पिक्सेल 9, पिक्सेल 9 प्रो, पिक्सेल 9 प्रो फोल्ड आणि पिक्सेल 9 प्रो एक्सएल असे चार मॉडेल्स या मालिकेत येण्याची चर्चा आहे. गुगलने आत्तापर्यंत फक्त पिक्सेल 9 प्रो आणि पिक्सेल 9 प्रो फोल्ड या दोन स्मार्टफोन्सची झलक दाखवली आहे, पण त्यांची अधिकृत माहिती अद्याप कंपनीने दिली नाहीये. मात्र, लीक झालेल्या माहितीवरून या फोनमध्ये कोणकोणत्या फीचर्स असतील याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

कॅमेरा

Pixel 9 Pro मध्ये 42 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि तीन कॅमेऱ्यांचा सेटअप असण्याची शक्यता आहे. यामध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 48 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 48 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा समाविष्ट आहे.

Pixel 9 Pro Fold मध्ये 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि तीन कॅमेऱ्यांचा सेटअप येण्याची अपेक्षा आहे. यामध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 10.5 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 10.8 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा असेल.

डिस्प्ले आणि बॅटरी

लीक झालेल्या माहितीनुसार, पिक्सेल 9 मध्ये ६.३ इंचांचा डिस्प्ले असेल आणि तो काळा, हलका राखाडी, पांढरा आणि गुलाबी अशा चार रंगांमध्ये उपलब्ध होईल. फोनची मागची बाजू मॅट फिनिशची असेल. पिक्सेल 9 प्रो मध्येही ६.३ इंचांचा डिस्प्ले असण्याची शक्यता आहे, तर पिक्सेल 9 प्रो एक्सएल मध्ये मोठा, ६.८ इंचांचा डिस्प्ले असू शकतो. पिक्सेल 9 प्रो फोल्ड मध्ये बाहेरचा ६.३ इंचांचा डिस्प्ले आणि आतून उघडल्यानंतर ८ इंचांचा मुख्य डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.

रिपोर्टनुसार, पिक्सेल 9 मालिकेत जलद चार्जिंगची सुविधा असेल. पिक्सेल ९ आणि पिक्सेल ९ प्रो ३० मिनिटांत ५५ टक्केपर्यंत चार्ज होऊ शकतात. नवीन ४५ वॉट चार्जर वापरून पिक्सेल ९ प्रो एक्सएल ७० टक्केपर्यंत चार्ज होईल. ५,०६०mAh चा बॅटरी पॅक असलेल्या पिक्सेल ९ प्रो एक्सएल मध्ये २४ तासांपर्यंत चार्ज टिकण्याची शक्यता आहे आणि अतिरिक्त बॅटरी सेवर मोड वापरून ही टेंबल १०० तासांपर्यंत वाढवता येऊ शकते.

दमदार परफॉर्मन्ससाठी नवीन चिपसेट

गुगलच्या टेंसर जी4 चिपसेटवर चालणारी ही सीरिज अधिक चांगले परफॉर्मन्स देण्याची अपेक्षा आहे. बेसिक मॉडेल असलेल्या पिक्सेल 9 मध्ये १२ जीबी रॅम असू शकते, तर प्रो मॉडेल्समध्ये, ज्यात पिक्सेल 9 प्रो फोल्डचा समावेश आहे, त्यात १६ जीबी रॅम असू शकते.

AI फीचर्स

Pixel 9 मालिकेत गुगलचा AI आणि जेमिनी यांचा वापर होणार आहे. यातून अनेक जबरदस्त फीचर्स येणार आहेत. मॅजिक एडिटर या फीचरमुळे तुम्ही फोटोत बदल करण्यासाठी टेक्स्ट वापरू शकता. तसेच, ‘अॅड मी’ फीचरमुळे तुम्ही ग्रुप फोटोंमध्ये स्वतःलाही समाविष्ट करू शकता.

याशिवाय, ‘सर्कल टू सर्च’ फीचरमुळे तुम्हाला फोनमधील गोष्टी शोधणे सोपे होईल. तसेच, स्क्रीनशॉट्समधून माहिती काढणे सोपे करण्यासाठी ‘Pixel Screenshots’ फीचर देखील येणार आहे. Pixel Drops या फीचरमधून Pixel 9 वापरकर्त्यांना विशेष फायदे मिळतील.

हे सगळे फीचर्स अद्याप लीक आणि अफवांवर आधारित आहेत. या फोनच्या अधिकृत स्पेसिफिकेशन्स स्मार्टफोन लॉन्चच्या वेळी समोर येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDWvsSLW : भारताची ‘नारी शक्ती’! श्रीलंकेला पराभूत केले; पाकिस्तान, न्यूझीलंडला धक्के बसले, Semi चे गणित मजेशीर झाले

IND vs BAN: भारताकडून दिल्लीतही बांगलादेश चीतपट! कर्णधार सूर्यकुमारच्या टीमने मालिकाही घातली खिशात

‘MPSC’कडून संयुक्त पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर! 5 जानेवारी व 2 फेब्रुवारीला ‘या’ परीक्षा; 1813 पदांची होणार भरती

Record तोड खेळी! नितीश रेड्डी-रिंकू सिंगची जमली जोडी; लोकेश राहुल-MS Dhoni चा मोडला विक्रम

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT