google play new auto open feature esakal
विज्ञान-तंत्र

Play Store Auto Open : गुगल Play Store मध्ये येतीये 'ऑटो-ओपन'ची सुविधा; कसं काम करणार हे खास फीचर? जाणून घ्या एका क्लिकमध्ये..

google play store auto open function : Google Play Store मध्ये लवकरच एक नवीन 'ऑटो-ओपन'ची सुविधा येणार आहे.

Saisimran Ghashi

google play store auto open app feature : अँन्ड्रॉईड स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Google Play Store मध्ये लवकरच एक नवीन 'ऑटो-ओपन'ची सुविधा येणार आहे. या फीचरमुळे आता तुम्ही एखादी अॅप इनस्टॉल केल्यानंतर ती शोधण्याची गरज नाही राहणार. अॅप इनस्टॉल झाल्यानंतर ती थेट ओपन होईल.

या नवीन फीचरबद्दलची माहिती Android Authority ची रिपोर्ट आणि टिप्सटर असेंबल डिबग यांनी दिली आहे. या रिपोर्टनुसार, Google लवकरच या फीचरची अधिकृत घोषणा करेल अशी शक्यता आहे. जून २०२४ मध्ये Google Play Store च्या 42.5.15 या आवृत्तीच्या चाचणीदरम्यान या फीचरची झलक आधीच दिसून आली होती. सध्या ही सुविधा सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही.

कशी काम करेल 'ऑटो-ओपन' ची सुविधा?

रिपोर्टप्रमाणे, एखादी अॅप इनस्टॉल झाल्यानंतर स्क्रीनवर ५ सेकंदांचा काउंटडाउन दिसणार आहे. या काउंटडाउन संपल्यानंतर अॅप स्वयंचलितपणे उघडेल.

Play Store वर अॅप इनस्टॉल करताना 'इन्स्टॉल' बटनाखाली नवीन 'ऑटोमॅटिकली ओपन आफ्टर इन्स्टॉल' (इनस्टॉल झाल्यानंतर स्वयंचलित उघडा) हा पर्याय दिसणार आहे. वापरकर्ते या पर्यायाद्वारे हे फीचर सुरू करू शकतात.

वापरकर्ते हा पर्याय बंद देखील करू शकतात. या नवीन फीचरमुळे अॅप इनस्टॉल करण्याची प्रक्रिया आणखी सोपी आणि जलद होणार आहे.

अॅप डाउनलोड आणि अपडेटही झटपट

Google Play Store मध्ये या 'ऑटो-ओपन' सोबतच आणखी एक चांगली बातमी आहे. आता तुम्ही Android स्मार्टफोनवर एकाच वेळी तीन अॅप्स डाउनलोड किंवा अपडेट करू शकता. एप्रिल २०२४ मध्ये आलेल्या एकाच वेळी दोन अॅप्स डाउनलोड करण्याच्या फीचरमध्ये आणखी सुधारणा करून ही सुविधा आणली गेली आहे. यामुळे आता अॅप अपडेट करण्याची प्रक्रिया आणखी जलद होणार आहे.

या फीचर्सची अधिकृत घोषणा Google ने अद्याप केलेली नसली, तरीही भारतासह अनेक देशांमधील अनेक Android वापरकर्त्यांना या फीचर्सचा अनुभव आता येऊ लागला आहे. अनेक अॅप्स एकाच वेळी डाउनलोड किंवा अपडेट करताना वापरकर्त्यांना तीन अॅप्स कार्यरत दिसतील, तर इतर अॅप्स पहिल्या तीन पूर्ण झाल्यानंतर 'पेडिंग' (प्रलंबित) स्थितीत राहातील.

या नवीन फीचर्सद्वारे Google Android वापरकर्त्यांचा अनुभव आणखी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे अॅप इनस्टॉल आणि अपडेट करण्याची प्रक्रिया आणखी जलद आणि सोपी होणार आहे. या फीचर्स लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT