Fake Loan Apps eSakal
विज्ञान-तंत्र

Fake Loan Apps : प्ले स्टोअरवरुन 17 फ्रॉड लोन अ‍ॅप्स केले डिलीट, तुमच्याकडे तर नाहीत ना? पाहा संपूर्ण यादी

कर्जाच्या वसूलीसाठी नागरिकांना ब्लॅकमेल करणे, धमकी देणे आणि त्रास देणे अशा गोष्टी या अ‍ॅप्सचे कर्मचारी करत होते.

Sudesh

Google Play Store Deleted Fake Loan Apps : लोन अ‍ॅप्सच्या माध्यमातून फसवणूक होण्याच्या घटनांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरील 17 फेक लोन अ‍ॅप्सना डिलीट केलं आहे. हे अ‍ॅप्स खऱ्या लोन अ‍ॅप्सच्या रुपात उपलब्ध होते. मात्र, डाऊनलोड केल्यानंतर ते यूजर्सचा डेटा चोरुन हॅकर्सना देत होते.

ESET रिसर्चर्सने केलेल्या एका सर्वेक्षणात हे 17 अ‍ॅप्स समोर आले होते. या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, गुगलने डिलीट करण्यापूर्वी सुमारे 12 मिलियन लोकांनी हे अ‍ॅप्स डाऊनलोड केले होते.

कोणते आहेत हे अ‍ॅप्स?

गुगलने या अ‍ॅप्सची यादी प्रसिद्ध केली आहे. ही अ‍ॅप्स तुमच्या स्मार्टफोनमधील असतील, तर त्वरीत अनइन्स्टॉल करण्याचं आवाहन कंपनीने केलं आहे.

  • 4S Cash

  • AA Kredit

  • Amor Cash

  • Cashwow

  • CrediBus

  • GuayabaCash

  • EasyCredit

  • FlashLoan

  • Finupp Lending

  • TrueNaira

  • EasyCash

  • PréstamosCrédito

  • Préstamos De Crédito-YumiCash

  • Go Crédito

  • Instantáneo Préstamo

  • Cartera grande

  • Rápido Crédito

काय करायचे हे अ‍ॅप्स?

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, यातील बहुतांश लोन अ‍ॅप्स हे यूजर्सचा डेटा चोरत होते. काही अ‍ॅप्स यूजर्सना लोन दिल्यानंतर आवश्यकतेपेक्षा जास्त व्याज आकारत होते. पैसे परत करण्यासाठी 91 दिवसांऐवजी 5 दिवसांचा वेळ देणे, वर्षाला 160 ते 130 टक्के व्याज आकारणे असे प्रकार होत होते. तसंच वसूलीसाठी नागरिकांना ब्लॅकमेल करणे, धमकी देणे आणि त्रास देणे अशा गोष्टी या अ‍ॅप्सचे कर्मचारी करत होते. (Tech News)

ESET कंपनीतील रिसर्चर लुकास स्टेफान्को यांनी सांगितलं, की या अ‍ॅप्सच्या माध्यमातून कित्येक लोकांना जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. मेक्सिको, इंडोनेशिया, पाकिस्तान, भारत, कोलंबिया, पेरु, फिलिपिन्स, इजिप्त, केनिया, नायजेरिया, सिंगापूर अशा देशांमध्ये हे अ‍ॅप्स कार्यरत होते असं त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT