play store 
विज्ञान-तंत्र

Google ने प्ले स्टोअरवरून काढले हे 6 धोकादायक ॲप्स; लगेच करा डिलीट

सकाळ डिजिटल टीम

इंटरनेटच्या या युगात जिथे अनेकांचे काम सोपे झाले आहे, तिथे लोकांची सायबर फसवणूक होण्याच्या घटनाही खूप घडत आहेत. ही सायबर फसवणूक ॲप, वेबसाइट, व्हॉट्सॲपसह इतर अनेक माध्यमातून केली जाते. मात्र, कंपन्याही माहिती मिळताच फसवणूक करणारे ॲप ब्लॉक करत राहतात. अशा लोकांचा डेटा चोरणारे आणि लोकांच्या फोनवर व्हायरस पसरवणारे 6 Apps गुगलने आपल्या App स्टोअर म्हणजेच प्ले-स्टोअरवरून काढून टाकले आहेत.

या सर्व अॅप्समध्ये शार्कबॉट बँक स्टीलर मालवेअर देखील होते जे लोकांची बँक माहिती चोरत होते. रिपोर्टनुसार हे मालवेअर ॲप्स 15,000 हून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहेत, परंतु आता Google ने हे सर्व ॲप्स आपल्या Play-store वरून काढून टाकले आहेत. Google ने App त्यांच्या प्ले स्टोअरमधून काढून टाकले आहेत आणि जर हे ॲप्स तुमच्या फोनमध्ये असतील तर तुम्ही ते देखील काढून टाका.

Google ने हटवलेले ॲप्स लोकेशन, फोन नंबर आणि ईमेल ॲड्रेससह ॲप वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा गोळा करत होते. Google ने सांगितले की कंपनी नियमितपणे त्यांच्या धोरणाचे पालन न करणाऱ्या अॅप्सवर योग्य कारवाई करते.

रिपोर्टनुसार, हे सर्व ॲप्स त्याच्या जिओफेन्सिंग फीचर (लोकेशन) द्वारे यूजर्सना ट्रॅक करत होते. सतत ट्रॅकिंग केल्यानंतर, हे ॲप्स वापरकर्त्याने लॉगिन केलेल्या सर्व वेबसाइट्स आणि अॅप्सचा डेटा गोळा करत असत. हे ॲप्स वापरकर्त्याद्वारे कोणत्याही साइटवर केलेल्या लॉगिनचा डेटा रेकॉर्ड करण्यासाठी वापरला जातो, ज्यामध्ये लॉगिन आयडीपासून पासवर्डपर्यंतचा समावेश होतो. हे ॲप्स इटली आणि ब्रिटनमध्ये अधिक सक्रिय होते.

सिक्युरिटी रिसर्च कंपनी चेक पॉइंटने आपल्या ब्लॉगमध्ये या अॅप्सची माहिती दिली आहे. या सर्व अॅप्समध्ये शार्कबॉट मालवेअर होते जे वापरकर्त्यांच्या फोनमध्ये "ड्रॉपर्स" अॅप डाउनलोड करत होते आणि या ॲपद्वारे वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरली जात होती. शार्कबॉट मालवेअर वापरकर्त्यांकडून एसएमएस, जावा कोड डाउनलोड करणे, इन्स्टॉलेशन फाइल, लोकल डेटाबेस अपडेट करणे, ॲप अनइंस्टॉल करणे, कॉन्टॅक्ट्स, बॅटरी ऑप्टिमायझेशन अशा 22 प्रकारच्या परवानग्या घेत होते.

Google ने ब्लॉक केलेली किंवा काढून टाकलेली सर्व 6 ॲप्स Zbynek Adamcik, Adelmio Pagnotto आणि Bingo Like Inc सारख्या कंपन्यांनी विकसित केली आहेत. यामध्ये Atom Clean-booster Antivirus, Antivirus super cleaner, Alpha antivirus cleaner, powerful cleaner antivirus, center security antivirus, Center security antivirus अशी या ॲप्सची नावे आहेत. यापैकी कोणतेही ॲप तुमच्या फोनवर असल्यास ते लगेच डिलीट करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT