Fake Loan Apps eSakal
विज्ञान-तंत्र

Fake Loan Apps : फेक लोन अ‍ॅप्सवर गुगलची सर्वात मोठी कारवाई; प्ले स्टोअरवरुन हटवले तब्बल 2,200 अ‍ॅप्स

लोक गरजेच्या वेळी अशा अ‍ॅप्सची मदत घेतात. मात्र, यांपैकी बऱ्याच अ‍ॅप्सचे कर्मचारी त्यानंतर ग्राहकांना मानसिक त्रास, धमक्या द्यायला सुरू करतात. काही प्रकरणांमध्ये ग्राहकांची आर्थिक फसवणूक देखील होते.

Sudesh

Google Action on Fake Loan Apps : आजकाल काही मिनिटांमध्येच लोन उपलब्ध करुन देणारे कित्येक अ‍ॅप्स प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहेत. यांपैकी बरेच अ‍ॅप्स तर जास्त डॉक्युमेंट्सही मागत नाहीत. त्यामुळे लोक गरजेच्या वेळी अशा अ‍ॅप्सची मदत घेतात. मात्र, यांपैकी बऱ्याच अ‍ॅप्सचे कर्मचारी त्यानंतर ग्राहकांना मानसिक त्रास, धमक्या द्यायला सुरू करतात. काही प्रकरणांमध्ये ग्राहकांची आर्थिक फसवणूक देखील होते. अशाच फेक लोन अ‍ॅप्सवर गुगलने मोठी कारवाई केली आहे.

यूजर्सच्या सुरक्षिततेसाठी गुगलने प्ले स्टोअरवर असणारे तब्बल 2,200 फेक लोन अ‍ॅप्स डिलीट केले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुगलने एप्रिल 2021 ते जुलै 2022 या कालावधीत 3,500 ते 4,000 लोन अ‍ॅप्सची पडताळणी केली. यानंतर सुमारे 2,500 अ‍ॅप्स डिलीट केले. यानंतर सप्टेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये देखील गुगलने असेच 2,200 अ‍ॅप्स प्लेस्टोअरवरुन हटवले आहेत.

पॉलिसीमध्ये केला बदल

गुगलने अशा अ‍ॅप्ससाठी आपल्या पॉलिसीमध्ये बदल केला आहे. आता केवळ रजिस्टर्ड संस्था किंवा रजिस्टर्ड संस्थांसोबत काम करणाऱ्या अ‍ॅप्सनाच प्ले-स्टोअरवर स्थान देण्यात येत आहे. देशातील वाढत्या लोन अ‍ॅप्समुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

कशी घ्याल खबरदारी?

  • एखादे लोन अ‍ॅप हवे असेल, तर केवळ गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरुनच डाऊनलोड करा.

  • जे अ‍ॅप्स आरबीआयकडे रजिस्टर नाहीत, अशा अ‍ॅप्सना आपली खासगी माहिती देऊ नका.

  • लोन अ‍ॅप्सवरुन फसवणूक झाल्यास त्वरीत सायबर पोलीस आणि बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT