Google's New Feature: Edit RCS Messages, Instant Hotspot, and New WearOS Capabilities esakal
विज्ञान-तंत्र

Google Messages Editing : चुकीचा मेसेज सेंड झालाय? काळजी करू नका,गुगलचं 'हे' एडिटिंग फिचर वापरून बघा

सकाळ डिजिटल टीम

Google Update : Android वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.आता तुम्ही पाठवलेल्या मेसेजमध्ये चुकून एखादी चुकी झाली तर घाबरण्याची गरज नाही. Google ने Android साठी नवीन फीचर अपडेट केलेलं आहे, ज्यामध्ये RCS मेसेज पाठवल्यानंतर 15 मिनिट्सच्या आत तुम्ही ते एडिट करू शकता. आता मेसेजमध्ये टाईपो झाला,चुकीची माहिती पाठवली वा अन्य काही चूक झाली तर तुम्ही ती 15 मिनिटांच्या आत दुरुस्त करू शकता. या फीचरचा वापर Google Messages अॅप द्वारे करता येईल.

याशिवाय आणखी काही फायदेशीर फीचर्स या अपडेटमध्ये समाविष्ट आहेत. जसे, एखाद्या Android स्मार्टफोनची हॉटस्पॉट सुविधा वापरून तुमचे टॅब्लेट किंवा Chromebook सहजतेने कनेक्ट करता येणार आहे. आता पासवर्ड टाईप करण्याची गरज नाही. कोणत्याही डिव्हाइसवरून व्हिडिओ कॉल करण्याची सोय देखील या अपडेटमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. तुमचे स्मार्टफोन, वेब ब्राउजर किंवा टॅब्लेट यापैकी कोणतेही डिव्हाइस वापरून व्हिडिओ कॉल सुरु करता येईल.

या अपडेटमध्ये आणखी काही रोमांचक गोष्टी आहेत. निवडक MINI गाड्यांसाठी आता Android स्मार्टफोन डिजिटल कार की (Digital Car Key) म्हणून वापरता येणार आहे. गाडी अनलॉक करणे, लॉक करणे आणि स्टार्ट करणे यासारख्या सुविधा तुमच्या Android स्मार्टफोनवरून करता येणार आहेत. लवकरच या फीचरचा समावेश Mercedes-Benz आणि Polestar गाड्यांमध्येही होणार आहे.

Google Home Favorites विजेट आणि WearOS स्मार्टवॉचवरच्या Google Home Favorites टाईल आणि कॉम्प्लिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्ट होम उपकरणांवर आता नियंत्रण ठेवू शकता. अमेरिका आणि जर्मनीमध्ये राहणाऱ्या Google Wallet वापरणाऱ्या यूजर्स आता PayPal द्वारे पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

तसेच, Gboard वरून दोन इमोजी टाईप करून तुम्ही नवीन इमोजी किचन स्टिकर कॉम्बिनेशन वापरू शकणार आहात.या नवीन फीचर्समुळे Android वापरणे आणखीन सोयीस्कर आणि मजेदार होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20WC: भारताने पाकिस्तानला हरवले, तरीही टेंशन कायम; Semi Final चे ‘स्कोअर’ जुळता जुळेना...

Railway Track मेन्टेनन्स मशीनची समोरासमोर धडक; 5 कर्मचारी जखमी, देखभालीचं काम सुरू असताना घटना

Bigg Boss Marathi 5 Grand Finale LIVE Updates - जान्हवी किल्लेकर ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर; निवडली पैशांची बॅग

IND W vs PAK W: ०.४४ सेकंद! Richa Ghosh ची भारी रिअ‍ॅक्शन, अविश्वसनीय झेल घेऊन पाकिस्तानला दाखवला इंगा

Video : शाळेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी गायलं 'अयि गिरि नन्दिनी'; नेटकरी झाले मंत्रमुग्ध, येथे पाहा Viral Video

SCROLL FOR NEXT