कॉल रेकॉर्ड करण्यासाठी जर तुम्ही थर्ड-पार्टी ॲप वापरत असाल तर काही दिवसांनी तुम्ही तसे करू शकणार नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे Google च्या नवीन धोरणानुसार Android स्मार्टफोन्सवरील थर्ड-पार्टी कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर कारवाई करणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, 11 मे पासून ॲप डेव्हलपर थर्ड पार्टी ॲप्सद्वारे कॉल रेकॉर्डिंग फीचर देऊ शकणार नाहीत. कंपनीने अलीकडेच आपल्या Play Store धोरणात काही बदल केले आहेत आणि त्यानुसार Android वर कॉल रेकॉर्डिंग ॲप्स बंद करण्याचा कंपनीचा उद्देश आहे. नवीन धोरणानुसार, ॲप्सना यापुढे Play Store वर कॉल रेकॉर्डिंगसाठी Accessibility API वापरण्याची परवानगी असणार नाही.
वापरकर्त्यांवर काय परिणाम होईल?
या धोरणातील बदलाचा अर्थ असा की जे अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्ते इनबिल्ट कॉल रेकॉर्डरशिवाय स्मार्टफोन वापरत आहेत त्यांना 11 मे नंतर कॉल रेकॉर्ड करता येणार नाहीत. तसेच, नवीन धोरणातील बदल, पूर्वी Reddit वापरकर्त्यांनी NLL ॲप्सद्वारे पाहिले होते, तसेच या निर्णयाचा फक्त थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर परिणाम होणार आहे.
फोनमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचर हे नेहमीप्रमाणेच काम करेल. त्यामुळे जर एखाद्या वापरकर्त्याला त्याच्या स्मार्टफोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगचा बिल्ट-इन पर्याय असेल तर तो त्याचा वापर सुरू ठेवू शकतो. याचा अर्थ ते कॉल रेकॉर्ड करू शकतात, परंतु कोणतेही थर्ड पार्टी ॲपवापरून हे करता येणार नाही. कॉल रेकॉर्डिंग फीचर ऑफर करणाऱ्या फोनमध्ये Xiaomi, काही Samsung आणि Google Pixel चे फोन आहेत. याचे कारण असे की सिस्टम अॅप्स फोनमध्ये प्री-इंस्टॉल केल्यामुळे त्यांना कोणत्याही परवानग्या मिळू शकतात.
Android डिव्हाइसवर कॉल रेकॉर्डिंग थांबवण्यासाठी बऱ्याच काळापासून कंपनी काम करत आहे. त्याने Android 6 वर रीअलटाइम कॉल रेकॉर्डिंगचा एक्सेस ब्लॉक केला आणि Android 10 वरील मायक्रोफोनवर कॉल रेकॉर्डिंगवर बंधने आणली आहेत. मात्र, कॉल रेकॉर्डिंग ॲपृप्सनी अँड्रॉइड 10 आणि नंतरचे कॉल रेकॉर्ड करण्यासाठी ऍक्सेसिबिलिटी सर्व्हिस वापरण्यास सुरुवात केली. गुगलने आपल्या डेव्हलपर सेमिनारमध्ये धोरणातील बदलाचे स्पष्टीकरणही दिले आहे. कंपनीकडून वेबिनार दरम्यान Google Play पॉलिसी अपडेटचे स्पष्टीकरण दिले- "जर ॲपफोनवर डीफॉल्ट डायलर असेल आणि ते प्री-लोड देखील असेल, तर येणार्या ऑडिओ स्ट्रीममध्ये एक्सेस मिळवण्यासाठी एक्सेसबिलीटी कॅपेबिलीटी असणे आवश्यक नाही आणि त्यामुळे नियमांचे उल्लंघन ठरत नाही."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.