YouTube on Deepfake eSakal
विज्ञान-तंत्र

Deepfake : 'डीपफेक'बाबत आता गुगलनेही घेतली अ‍ॅक्शन; यूट्यूबर्सना दिला गंभीर इशारा

Google action on Deepfake : गेल्या काही दिवसांपासून डीपफेकचा मुद्दा चर्चेत आहे.

Sudesh

YouTube on Deepfake : गेल्या काही दिवसांपासून डीपफेकचा मुद्दा चर्चेत आहे. भारत सरकारने याबाबत ठोस नियमावली तयार करण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांना निर्देश दिले आहेत. यातच आता गुगलने देखील आपल्या यूट्यूब या प्लॅटफॉर्मच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता यूट्यूब कंटेंट क्रिएटर्सना कोणतीही पोस्ट करण्यापूर्वी त्यातील एआयच्या वापराबाबत खुलासा करावा लागणार आहे.

अशी होणार कारवाई

कंटेंट क्रिएटर्सना आपल्या व्हिडिओमध्ये एआयचा कसा आणि किती वापर केला आहे, काय बदल केले आहेत याबाबत माहिती द्यावी लागणार आहे. ही माहिती न दिल्यास, गुगल स्वतःच कारवाई करत असे व्हिडिओ हटवणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

काय आहे डीपफेक?

डीपफेक व्हिडिओ म्हणजे असे व्हिडिओ ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा चेहरा, आवाज, हावभाव बदलून नवीन व्हिडिओ तयार केले जातात. काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदाना, कॅटरीना कैफ, काजोल आणि अगदी सारा तेंडुलकरला देखील डीपफेक व्हिडिओंमुळे भरपूर त्रास सहन करावा लागला होता. यानंतर पंतप्रधान मोदींनी देखील डीपफेक व्हिडिओंबाबत चिंता व्यक्त केली होती. (Tech News)

सरकारची कारवाई

केंद्र सरकार देखील डीपफेकच्या बाबतीत गांभीर्याने पावलं उचलत आहे. डीपफेक किंवा ऑनलाईन चुकीच्या कंटेंटबाबत तक्रार करण्यासाठी सरकार एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करणार आहे. सोबतच अशा प्रकरणांकडे लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष अधिकारी देखील नियुक्त करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT