Google updated Find My Device Feature : आजकाल सगळ्या स्मार्टफोनमध्ये जीपीएस प्रणाली मिळते. त्यामुळे फोन हरवला किंवा चोरीला गेला तरी तो शोधता येतो. मात्र, यासाठी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे हरवलेला फोन चालू, म्हणजेच स्विच ऑन असायला हवा. मात्र आता गुगलने एक नवीन अपडेट लाँच केलं आहे, यामुळे तुमचा फोन बंद असला, तरीही तो शोधता येणार आहे.
गुगलचं फाइंट माय डिव्हाईस हे फीचर एखाद्या स्मार्टफोनची लोकेशन शोधण्यासाठी वापरलं जातं. यापूर्वी गुगलच्या या फीचरचा वापर करण्यासाठी तुमचा फोन ऑन असणं गरजेचं होतं. मात्र, आता गुगलच्या नव्या अपडेटनंतर ही अट गरजेची नसेल. नव्या टेक्नॉलॉजीमुळे जगभरातील इतर अँड्रॉइड डिव्हाईसेसची मदत घेऊन स्विच ऑफ असणारा अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेट शोधता येईल.
गुगलने सध्या हे फीचर आपल्या Pixel 8 आणि Pixel 8 Pro या दोन स्मार्टफोनवर दिलं आहे. फोन स्विचऑफ झाल्यानंतर देखील कसंकाय ट्रॅक होऊ शकतो याबाबत कंपनीने अधिक माहिती दिली नाही. मात्र, पिक्सेल फोनमध्ये असणाऱ्या एका खास हार्डवेअर सेटिंगमुळे हे शक्य असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
गुगलच्या या फीचरमुळे तुमचा हरवलेला पिक्सेल फोन ऑफ असला, तरीही त्यामध्ये रिंग वाजवता येणार आहे. तसंच त्याचं लाईव्ह ट्रॅकिंगही करता येणार आहे. त्यामुळे हा फोन ऑफ करून कुठे नेला जात असेल, तरीही तो ट्रॅक करता येईल. हे फीचर सध्या केवळ अमेरिका आणि कॅनडामध्ये लाँच करण्यात आलं आहे.
गुगलच्या इतर अँड्रॉइड फोनमध्ये देखील Find My Device फीचरचं अपग्रेडेड व्हर्जन वापरता येईल. यासाठी तुमच्याकडे अँड्रॉइड 9 Pie किंवा त्याहून पुढची ओएस असणं गरजेचं आहे. नवीन फाइंड माय डिव्हाइस फीचर हे नेटवर्क लोकेशन डेटा आणि डिव्हाइसची लोकेशन रिपोर्टिंग हे सुरक्षित ठेवतं. यासाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन वापरण्यात येतं.
हे फीचर ऑन करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी सेटिंग्समध्ये जावं लागेल.
यानंतर Find My हे कीवर्ड्स सर्च करा.
यानंतर Find My Device हा पर्याय तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. त्यावर टॅप करुन तो सुरू करा.
तुमच्या फोनमध्ये गुगल अकाउंट लॉग-इन असणं आवश्यक आहे.
यासाठी तुम्हाला Find My Device या वेबसाईटवर जावं लागेल.
यानंतर तुमच्या फोनमध्ये लॉग-इन असलेल्या गुगल अकाउंटवरुन लॉग-इन करावं लागेल.
यानंतर ते अकाउंट ज्या-ज्या डिव्हाइसमध्ये लॉग-इन आहे त्याची सर्व लिस्ट तुम्हाला दिसेल.
यानंतर तुमच्या फोनची शेवटची लोकेशन तुम्हाला पहायला मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.