Food Delivery App : हल्ली ऑनलाइन फूड डिलीव्हरी अॅप भारतात फार लोकप्रिय होत चाललेत. लाखो लोक रोज झोमॅटो, स्विगी आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून जेवण मागवतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या प्लॅटफॉर्म्सवरून लोकांना फार समस्या येत असल्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. या सगळ्यांवर उपाय म्हणून शासनाने ONDC (Open Network for Digital Commerce) हा नवा अॅप काढलाय. हे अॅप सप्टेंबर 2022 पासून सुरू आहे. रिपोर्टनुसार अलीकडेच ONDC ने 10000 ऑर्डर्सचा आकडा पार केलाय. ग्राहकांमध्ये आता या अॅपबाबतची लोकप्रियता वाढत चालली आहे.
इतर फूड डिलीव्हरी अॅपपेक्षा ONDC स्वस्त
अनेक ग्राहक ONDC वरून फूड ऑर्डर केल्यानंत त्याचे बिल सोशल मीडियावर शेअर करताय. तसेच इतर फ्लॅटफॉर्मच्या तुलनेत अॅप किंमती स्वस्त असल्याचा ग्राहकांचा अनुभव आहे.
ONDC काय आहे?
डिजीटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क (ONDC) भारत सरकारद्वारे विकसित करण्यात आले आहे. हा एक असा अॅप आहे जिथून जेवणाचे पार्सल सरळ तुमच्या घरी येते. अर्थात ही सर्व्हिस थेट बिजनेस टू कस्टमर अशी आहे. याशिवाय या अॅपवरून तुम्ही घरातील किराण्याचे सामान तसेच घर सजावटीचे सामानही विकत घेऊ शकता. हे अॅप अगदी इंस्टामार्ट, Zepto आणि ब्लिंकिटसारखे आहे. ज्यावरून तुम्ही अनेक वस्तू आणि खाद्यपदार्थ ऑनलाइन ऑर्डर करू शकता. (Food)
हे अॅप झोमॅटोसारखे लोकांमध्ये लोकप्रिय नसले तरी हळू हळू शासनाच्या प्रयत्नांनी त्यास यश मिळत आहे. याच प्रयत्नातून या अॅपने त्यांचे दहा हजार ऑर्डर्सचा आकडा पूर्ण केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.