विज्ञान-तंत्र

ग्रेगर मेंडेल : जनुकशास्त्राचे जनक

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

आयुष्यभर कफल्लक जगलेल्या चित्रकार व्हॅन गॉगची कदर समाजानं त्याच्या हयातीत केली नाही पण मरणोपरांत त्याचं एक चित्र थेट ८२.५ मिलियन डॉलर्सला विकलं गेलं. अशी शोकांतिका फक्त ‘कला’क्षेत्रातच आहे असं नाही. विज्ञान-संशोधन क्षेत्रातही असे काही ‘मोहरे’आहेत ज्यांनी अगदी काळाच्या पुढंची मांडणी केली पण त्यांच्या हयातीत त्यांना तो मानसन्मान-श्रेय मिळालं नाही. आज याच श्रेणीतल्या एका संशोधकाची गोष्ट सांगतो. आताच्या ‘झेक’रिपब्लिक अंतर्गत येणाऱ्या तत्कालिन उत्तर मोराविया प्रांतातल्या जर्मन भाषिक बाबा ॲंटन आणि आई रोजिन या गरीब शेतकरी दाम्पत्याच्या पोटी त्याचा जन्म झाला. मोठी वेरोनिका आणि धाकटी थेरेसिया यांचा हा एकुलता एक भाऊ. तसा हा अगदी बालपणापासूनच अगदी साधा-सरळ आणि बराचसा लाजाळू.

शिक्षणाविषयी आस्था असली-शिक्षणाचं मोल माहित असलं तरी शैक्षणिक शुल्क भरण्याचीही मारामार असल्यानं त्याचं औपचारिक शिक्षणही तसं ‘जसं जमेल तसं’ चाललं होतं. बालपण ‘माळीकाम’करतांना मधुमक्षिकापालन शिकणं-पौगंडावस्थेत व्यायामशाळेत काम करणं असं करत तडजोडीनं का होईना दुसऱ्या बाजूला त्याचं शिक्षणही सुरू होतं. या दरम्यान तो आजारी पडला पण हे नेमकं त्याच्या पथ्थ्यावर पडलं. या कालावधीत त्यानं ओलोमॉक विद्यापीठात व्यावहारिक-सैद्धांतिक तत्वज्ञान आणि भौतिकशास्त्र या विषयांचा साकल्यानं अभ्यास केला. आजारपण थोडं लांबलं आणि आर्थिक तंगीमुळं पुन्हा एकदा शैक्षणिक शुल्काचा यक्षप्रश्न उभा राहिला. धाकटी बहिण थेरेसियानं तिच्या हुंड्यासाठी जमवलेली रक्कम त्याला देऊन टाकली. आता त्याला स्वत:चं शुल्क सोडवण्यासाठी हातपाय हलवणं बंधनकारक झालं होतं. त्यानं स्थानिक मठात अर्धवेळ ‘भिक्षुकी’सुरू केली.

ऑगस्टियन पंथात दाखल झाल्यानंतर स्थानिक प्रथेप्रमाणं त्याचं पाळण्यातलं नाव बदललं गेलं आणि त्याची गाडीही थोडी रुळावर आली. तत्वज्ञान विभागातून त्यानं आपला मोर्चा जोहान कार्ल नेसलर संचलित ‘नैसर्गिक इतिहास आणि शेतकी’विभागात वळवला. इथं त्यानं वनस्पती आणि प्राण्यांच्या विविध अनुवंशिक वैशिष्टयांचा आणि विशेषत: मेंढीचा विस्तारानं अभ्यास केला. त्याची चुणूक बघून त्याचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक फ्रेडरिक फ्रांझ यांनी त्याला ‘ब्रनो’इथल्या संत ऑगस्टियनच्या थॉमस या मठात दाखल होण्यासाठी प्रोत्साहित केलं. या ठिकाणी त्याचं ‘धर्मोपदेशक’होण्यासाठी हवं असणारं प्रशिक्षण सुरू झालं. सोबतच सालबादाप्रमाणं ‘पॉकेटमनी’साठी काहीतरी करावं म्हणून या वेळी त्यानं बदली शिक्षक म्हणून काम स्विकारलं. अध्यापनशास्त्राच्या प्रशिक्षणात नेमकं शेवटच्या काळात तो तोंडी परिक्षेत तो चक्क नापास झाला आणि पुढच्या वर्षी ‘ॲबॉट सिरिल फ्रॅटिसेक’शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी तो प्रा.ख्रिश्चियन डॉपलर यांच्या छत्रछायेखाली व्हिएना विद्यापीठात रवाना झाला.

इथं शिष्यवृत्तीच्या पैश्यातनं त्याला बाकी औपचारिक शिक्षणही घेता येणार होतं. काही कालावधीतच तो भैतिकशास्त्र शिकवण्यासाठी यावेळी मठात ‘शिक्षक’ म्हणून परतला. औपचारिकता म्हणून त्यानं ‘प्रमाणपत्र’परिक्षा दिली पण यावेळीही तो तोंडी परिक्षेत नापास झाला. पण एकुण अनौपचारिक अनुभव असल्यानं आणि औपचारिक अटी नसल्यानं तिथं तो ‘मठाधिपती’मात्र झाला. सुरूवातीच्या काळात त्याला परिसरातील रुग्णालयात असलेल्या अत्यवस्थ रुग्णांचं समुपदेशन करणं-चर्चचं ज्ञान देणं ही कामं सोपवण्यात आली पण हा संवेदनशील मणुष्य आजारी लोकांना बघून स्वत:च आजारी पडायला लागला त्यामुळं मुख्य पादरींनी त्याला या जबाबदारीतून मुक्त करत निसर्गाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. ही गोष्ट मात्र त्याच्या संशोधक वृत्तीस खतपाणी घालणारी ठरली. ऑस्ट्रियात त्याची भेट एकदा एका गणितज्ञाशी झाली आणि या भेटीत त्याला एक गोष्ट कळली ती म्हणजे “मानवनिर्मित असो वा निसर्गनिर्मित कुठल्याही गोष्टीला गणिती नियमानं समजावून घेता येऊ शकतं”

त्याच्या डोक्यात आता एका प्रश्नानं घर केलं ते म्हणजे “कुठल्याही जीव-जंतूत एका पिढीतून दुसऱ्या पिढीत शारिरीक लक्षणं नेमके कसे दिले जातात?”

या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यानं उंदराचं निरिक्षण करायला सुरूवात केली पण हे काम तिथल्या जेष्ठ मंडळींना रुचलं नाहीं. त्यांच्या नजरेत मठाची ही पवित्र जागा ईश्वराचा महिमा जाणून घेण्याचं केंद्र होतं-प्रयोगशाळा नव्हे. परिणामी त्याला उंदीर सोडून आपलं लक्ष्य वाटाण्यावर केंद्रीत करावं लागलं. त्याला हे जाणवलं की वाटाण्याचं फुल एक तर पांढरं असतं किंवा जांभळं. आता प्रश्न उभा राहिला की असं का?एक रोपटं आपल्या फुलाचा रंगं कसं ठरवतं? या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी त्यानं झाडातही नर मादी हा प्रकार असतो हे समजावून घेतलं. जेव्हा मिलन होतं तेव्हा नव्या रोपट्याच्या बीजाचा जन्म होतो. नवं रोपटं बनण्यासाठी लागणाऱ्या जोडप्याचं मुळ एकाच रोपात असू शकतं किंवा वेगळ्याही. यासाठी त्यानं सर्वप्रथम एका नेहमी पांढरी फुलं येणाऱ्या आणि एका कधीकधी जांभळी फुलं येणाऱ्या दोन रोपट्यांचा संकर केला आणि बघितलं की नव्या रोपट्याला येणारं फुल हे पांढरं होतं.

याच्या उलट प्रयोग केलेल्या रोपट्याला जांभळी फुलं आली. यात चकित होण्यासारखं काही नव्हतं जन्मदातं रोपटं पांढऱ्या फुलाचं होतं म्हणून नव्या रोपट्यालाही पांढरी फुलं आली तेच जांभळ्या फुलांच्या रोपट्याबाबतही झालं. या सुरूवातीच्या रोपट्यांच्या पिढीला त्यानं पिढी क्रमांक १ असं नाव दिलं. पण मजेशीर गोष्ट ही घडली की पांढऱ्या आणि जांभळ्या फुलांच्या रोपट्याच्या संकरातून पुढं नवी पिढी जांभळ्या फुलांची आली. जितक्या वेळा हा प्रयोग केला तितक्या वेळी जांभळीच फुलं जणू काही पांढरी फुलं जन्माला येण्याचा फॉर्म्युलाच हरवला. पिढी क्रमांक २चे सगळे रोपटे पांढऱ्या फुलांची झाली. आता त्यानं दुसऱ्या पिढीच्या दोन रोपट्यांचा संकर केला आणि जन्माला आली पिढी क्रमांक ३ यातही एक मजेशीर गोष्ट घडली ती म्हणजे या पिढीत काही फुलं पांढरी होती तर काही जांभळी. बारकाईनं आकडेवारी काढली तेव्हा लक्ष्यात आलं ७५ टक्के रोपट्यात जांभळी आणि २५ टक्के रोपट्यात पांढरी फुलं आली.

या सगळ्या प्रंपंचातून त्याच्या मनात काही प्रश्न उभे राहिले.

१.असं काय घडलं ज्यामुळं पिढी क्रमांक २ मध्ये पांढरी फुलं गायब झाली?

२.असं काय घडलं ज्यामुळं पिढी क्रमांक ३ मध्ये दोन्ही रंगांची फुलं आली?

३.ही रोपटी दरवेळी ७५:२५चं समीकरण कसं मानतात?

तेव्हा हे प्रश्न अनाठायी असले तरी आजच्या परिक्षेपात अत्यंत तार्किक होते. तेव्हा ‘डीएनए/जीन्स’सारख्या कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नव्हतं तरी त्यानं आपलं जे तत्व भारी पडतं त्याचा प्रभाव जास्त ठरतो हे तांत्रिक निरिक्षण परफेक्ट मांडलं. अगदी हेच प्राण्यांबद्दलही होतं..जन्मादरम्यान अपत्यात आई आणि बाबा दोघांचीही तत्व येतात. त्याच्या म्हणण्यानुसार हे एका गणिताद्वारे ठरतं की येणारं अपत्य नेमकं कसं असेल यालाच ‘लॉ ऑफ इनहेरिटन्स’अर्थात ‘अनुवंशिकतेचा नियम’म्हणतात. १८६५ साली त्यानं सगळं हे मांडलं तेव्हा ते प्रचंड गणिती असल्यानं कुणालाही कळलं नाही. शेवटी त्यानं स्वखर्चानं या सगळ्या लिखित मांडणीच्या चाळीस प्रती तत्कालिन ज्येष्ठ-श्रेष्ठ संशोधक अभ्यासकांना पाठवल्या यात एक दस्तुरखुद्द डार्विनही होता. या सगळ्या महानुभावांना हे सगळं थोडफार कळलं पण तांत्रिक गणिती बाजू कुणाच्याही डोक्यात बसली नाही आणि त्याचं ज्ञान आणि नावंही संशोधनाच्या इतिहासात अनेक वर्षे विलुप्त झालं. तो निराश झाला असला तरीही त्यानं ‘एक दिवस माझी वेळ नक्कीच येईल’म्हणत आपल्या सहकाऱ्यांना आश्वस्त केलं.

दरम्यानच्या काळात स्थानिक प्रशासनानं धार्मिक संस्थांवर लादलेल्या विशेष कर आकारणीमुळं त्याचा सगळा वेळ संघर्षातच गेला. यातच मुत्रपिंडाचा विकारही जडला आणि वयाच्या ६१व्या वर्षी त्याचं प्राणोत्क्रमण झालं. प्रशासनाशी जाचक कर आकारणीमुळं भांडण असल्यानं त्याच्या मृत्यूसोबतच त्याचा सगळा मौलिक दस्तावेज जाळण्यात आला. त्याच्या संशोधनाची महती कळायला पुढं तब्ब्ल तीन शतकं जावी लागली. विसाव्या शतकात त्याच्या सगळया नियमांचा पुनराभ्यास करण्यात आला आणि आधुनिक अनुवांशिक शास्रात त्याचं एकेक निरिक्षण अचूक ठरलं तो महान संशोधक म्हणजे ग्रेगर मेंडेल. आज मेंडेल यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT