GSAT-6 Satellite sakal
विज्ञान-तंत्र

GSAT-6 Satellite : जीसॅट-६ उपग्रहामुळे अचूक दिशा कळणार : एअर मार्शल विभास पांडे

लढाऊ विमानांच्या ट्रॅकिंग यंत्रणेत आत्मनिर्भरता, ६३ स्वदेशी विमाने ताफ्यात

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : भारतीय वायुसेना जीपीएस ट्रेकिंग प्रणालीमध्ये आत्मनिर्भर झाली आहे. यासाठी भारतीय प्रादेशिक उपग्रह दिक् चालन पद्धतीचा (एनएव्हीआयसी) वापर करण्यात आला आहे.

याद्वारे, सैन्याच्या लढाऊ विमानांची अचूक दिशा शोधण्यासाठी यंत्रणा (ट्रॅकिंग सिस्टिम) तयार करण्यात आली असल्याचे भारतीय वायुसेनेच्या मेंटेनन्स कमांडचे प्रमुख एअर मार्शल विभास पांडे म्हणाले.

शहरातील वायुसेनानगरमधील मेंटेनन्स कमांडच्या मुख्यालयात झालेल्या माध्यम संवादादरम्यान ते बोलत होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘जीसॅट-६’ या २०१५ मध्ये प्रक्षेपित केलेल्या उपग्रहाच्या मदतीने ही यंत्रणा उभी केली आहे. यामुळे, प्रत्येक चार सेकंदाला लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरची स्थिती अद्ययावत होऊ शकणार आहे.

भारतीय सैन्याच्या या आत्मनिर्भरतेमुळे विमानाची अचूक स्थिती, वैमानिकाशी संवाद साधणे सोपे जाणार असून अपघातही टाळता येतील, असेही एअर मार्शल पांडे यांनी नमुद केले.

सोबतच, वायुसेनेअंतर्गत येणारी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टरच्या देखभालीच्या कार्यात गेल्या पाच वर्षांपासून आत्मनिर्भरता आली असल्याचेही त्यांनी सांगितले. विमानांच्या देखभालीसाठी लागणारे सुटे भाग, इतर साहित्य परदेशातून न मागविता देशात तयार करण्यावर किंवा विकत घेण्याला प्राधान्य दिले जाते आहे. देखभालीमध्ये हे प्रमाण ९० टक्क्यांवर आले आहे.

भारतीय सेनेने आत्मनिर्भरतेकडे टाकलेल्या या पावलामुळे गेल्या पाच वर्षात आठशे कोटी रुपयांची बचत केली असून बचतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, अशी माहिती एअर मार्शल विभास पांडे यांनी दिली. मात्र, भारतीय सेना किंवा शासकीय संस्थांवर अवलंबून राहणे शक्य नसून यासाठी देशातील खासगी संस्थांची देखील वेळोवेळी मदत घ्यावी लागते.

खर्च वाचविण्याच्या दृष्टीने अशा मदतीची गरज असल्याचे ते म्हणाले. वरिष्ठ मेन्टेनन्स स्टाफ ऑफिसर एअर मार्शल वि. के. गर्ग, एअर व्हाईस मार्शल व्ही. एस. चौधरी, एअर व्हाईस मार्शल संदीप रावत, पीआरओ विंग कमांडर रत्नाकर सिंह व अन्य अधिकारी उपस्थित होते.

६३ स्वदेशी विमाने ताफ्यात

भारतीय वायुसेनेला अधिक सशक्त आणि आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने स्वदेशी बनावटीचे हलक्या वजनाची लढाऊ विमाने (एलसीए)तयार करण्यात येत आहे. गुजरातमधील वडोदरा येथे या विमानांची निर्मिती होत असून ६३ विमानांपैकी ४ विमाने सप्टेंबरमध्ये वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होतील.

शंभर मीटरमध्ये बांधकाम नको

माध्यम संवादा दरम्यान वायुदलाच्या या अधिकाऱ्यांनी देखभालीशी निगडित विविध माहिती दिली. दरम्यान, सामान्य जनतेशी निगडित एका महत्त्वाचा नियमाबाबत माहिती देण्यात आली. भारतीय सैन्य दलाच्या आस्थापनांच्या १०० मीटर परिसरामध्ये बहुमजली बांधकाम करण्यावर निर्बंध असल्याची माहिती देण्यात आली.

असे बांधकाम होत असल्याचे आढळल्यास सैन्यातर्फे स्थानिक प्राधिकरणांना माहिती देत बांधकाम थांबविले जाते. त्यामुळे, स्थानिकांनी जमीन किंवा संपत्ती घेताना या बाबीची काळजी घेण्याचे आवाहन वायुसेनेतर्फे करण्यात आले.

कळमेश्‍वर तालुक्यातील गाव दत्तक

भारतीय वायुसेनेच्या मेंटेनन्स कमांडतर्फे कळमेश्‍वर तालुक्यातील घोराड हे गाव नुकतेच दत्तक घेण्यात आले. या गावातील विद्यार्थांना शिक्षण, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना सुसज्ज ग्रंथालय, आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती, सैन्याबाबत माहिती देणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

गावकऱ्यांना गरजेच्या असलेल्या सुविधा मिळाव्यात म्हणून मेंटेनन्स कमांड स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT