Harley-Davidson X440 eSakal
विज्ञान-तंत्र

Harley-Davidson X440 : भारतात आली स्वस्तातली हार्ले डेव्हिडसन; किंमत बघून बुलेटला फुटला घाम..

हार्ले आणि हीरोने मिळून ही बाईक तयार केली आहे.

Sudesh

हार्ले डेव्हिडसन कंपनीने अखेर भारतात आपली बहुप्रतिक्षित बाईक लाँच केली आहे. Harley-Davidson X440 असं या बाईकचं नाव आहे. ४४० सीसी क्षमतेच्या या गाडीला तीन लाखांहून कमी किंमतीत लाँच केल्यामुळे रॉयल एनफिल्डला ही गाडी चांगलीच टक्कर देणार आहे.

हार्ले डेव्हिडसन या कंपनीची दुचाकींमध्ये भलतीच क्रेझ आहे. मात्र, महाग असल्यामुळे भारतीय याकडे पाठ फिरवत होते. मात्र, आता अगदी सामान्यांच्या आवाक्यातील किंमतीत लाँच केलेल्या या बाईकच्या माध्यमातून हार्लेचं भारतात दमदार आगमन झालं आहे.

भारतात तयार केली बाईक

हार्लेच्या या बाईकची किंमत कमी असण्याचं कारण म्हणजे, ही भारतात तयार करण्यात आली आहे. याचं डिझाईन आणि स्टायलिंग हार्लेने केलं आहे. तर इंजिनिअरिंग, टेस्टिंग आणि डेव्हलपिंग हे हीरो मोटोकॉर्पने केलं आहे. यामुळे ही बाईक संपूर्णपणे स्वदेशी असल्याचंही आपण म्हणू शकतो.

Harley-Davidson X440

किती आहे किंमत?

हार्लेच्या या गाडीच्या बेस व्हेरियंटची किंमत २.२९ लाख रुपयांपासून सुरू होते. X440 Denim असं या बेस व्हेरियंटचं नाव आहे. त्यापुढील व्हेरियंट X440 हे २.४९ लाख रुपयांना उपलब्ध आहे. तर, X440 S हे व्हेरियंट 2.69 लाख रुपयांना उपलब्ध आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत

मॉडर्न-रेट्रो लुक

हार्लेच्या या गाडीला मॉडर्न-रेट्रो असा मिस्क लुक देम्यात आला आहे. यामध्ये ४४० सीसी क्षमतेचं सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन २७hp पॉवर आणि 38Nm टॉर्क जनरेट करतं. यामध्ये ६ गिअर्स असणार आहेत, आणि स्टँडर्ड स्लिपर क्लचही देण्यात आलं आहे.

E20 सपोर्ट

या गाडीच्या इंजिनला OBD-2 मानांकनांनुसार तयार केलं आहे. त्यामुळे ही गाडी E20 इंधनावर देखील चालू शकते. यामध्ये पुढच्या बाजूला ३२० mm डिस्क ब्रेक, तर मागच्या बाजूला 240 mm डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. तसेच, यात ड्युअल चॅनल एबीएस देखील देण्यात आलं आहे.

Harley-Davidson X440

बुकिंगसाठी एवढी रक्कम

या गाडीला बुक करण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या अधिकृत डीलरशिपकडे जावं लागेल. यासाठी तुम्हाला २५,००० रुपये बुकिंग अमाउंट भरावी लागणार आहे. ही गाडी चार वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

138 crore gold seized In Pune: पुण्यात सापडले घबाड! निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांनी जप्त केले 138 कोटींचे सोने; 'तो' टेम्पो कोणाचा?

Rajan Salvi : 'मविआचे 188 उमेदवार विजयी होतील, त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री आणि मी मंत्री होईन'

IPL 2025 Retention : काव्या मारनची एक 'खेळी' अन् Rishabh Pant, KL Rahul, Shreyas Iyer सह बंडाला पेटली 'मंडळी'!

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs NZ: नशीबानं संधी मिळाली अन् Mitchell Santner ने ७ विकेट्स घेत सोनं केलं; भारताविरुद्ध मोठ्या विक्रमांना घातली गवसणी

SCROLL FOR NEXT