विज्ञान-तंत्र

Haryana Elections 2024 : हरियाणा निवडणुकीनंतर वोटिंग मशीनवर प्रश्नचिन्ह; कशी काम करते EVM मशीनची बॅटरी? जाणून घ्या

Saisimran Ghashi

EVM Battery : हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर काँग्रेसने ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) बॅटरी संदर्भात गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी असा दावा केला आहे की, ज्या ईव्हीएममध्ये 99% बॅटरी चार्ज होता, त्याठिकाणी काँग्रेस पराभूत झाली. तर, ज्या मशीनमध्ये 60-70% बॅटरी चार्ज होती, तिथे काँग्रेसला यश मिळाले.

काँग्रेसने हा आरोप अधिक स्पष्टपणे मांडलेला नाही, मात्र निवडणूक आयोगाकडे (ईसीआय) तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने पुढील काही दिवसांत आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावर याबाबत भाष्य करत, अनेक विधानसभा मतदारसंघांमधील तक्रारी आयोगापर्यंत पोहोचवणार असल्याचे नमूद केले,असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

ईव्हीएम बॅटरी कशा प्रकारे कार्य करते?

ईव्हीएम मशीन मुख्यत्वे अल्कलाइन बॅटरीवर चालते, ज्यामुळे वीज नसलेल्या भागातही निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. ईसीआयच्या माहितीनुसार, ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटला 7.5 ते 8 वोल्ट्सचा पॉवर पॅक असतो. याशिवाय, व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) युनिटला स्वतंत्र 22.5 वोल्ट्सचा पॉवर पॅक असतो.

ईव्हीएम बॅटरींचे उत्पादन सार्वजनिक क्षेत्रातील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) या कंपन्यांमार्फत केले जाते. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, कंट्रोल युनिटमध्ये बॅटरीच्या चार्ज स्थितीचे निरीक्षण केले जाते आणि “हाय”, “मीडियम”, “लो”, “मार्जिनल” किंवा “बॅटरी बदला” असा संकेत दिला जातो. बॅटरी संपल्यास क्षेत्र अधिकारी ‘रिजर्व’ बॅटरी उपलब्ध करून देतात.

साधारणत: एक नवीन बॅटरी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि मतमोजणीसाठी पुरेशी असते. बॅटरीची स्थिती 7.4 वोल्ट्सच्या खाली गेल्यावरच चार्जची टक्केवारी दाखवली जाते, आणि 5.8 वोल्ट्सवर पोहोचल्यास बॅटरी बदलण्याचा सिग्नल दिला जातो.

काँग्रेसने उपस्थित केलेल्या शंकांवर निवडणूक आयोग काय उत्तर देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDWvsSLW : भारताची ‘नारी शक्ती’! श्रीलंकेला पराभूत केले; पाकिस्तान, न्यूझीलंडला धक्के बसले, Semi चे गणित मजेशीर झाले

IND vs BAN: भारताकडून दिल्लीतही बांगलादेश चीतपट! कर्णधार सूर्यकुमारच्या टीमने मालिकाही घातली खिशात

‘MPSC’कडून संयुक्त पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर! 5 जानेवारी व 2 फेब्रुवारीला ‘या’ परीक्षा; 1813 पदांची होणार भरती

Record तोड खेळी! नितीश रेड्डी-रिंकू सिंगची जमली जोडी; लोकेश राहुल-MS Dhoni चा मोडला विक्रम

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT