hatchback hyundai i20 two new variants revealed with many new features added including sunroof  
विज्ञान-तंत्र

Hyundai i20 चे दोन नवीन व्हेरिएंट, मिळाले सनरूफसह अनेक दमदार फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

कोरियाची आघाडीची ऑटोमेकर Hyundai ने त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक कार i20 चे दोन नवीन व्हेरिएंट लॉंच केले आहेत. हे दोन व्हेरिएंट आहेत - 1.2 CVT Asta (O) आणि 1.0 DCT Sportz. कंपनीने त्यांची किंमत अनुक्रमे 10.51 लाख आणि 9.76 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवली आहे. अलीकडेच या सेगमेंटची सर्वाधिक विक्री होणारी मारुती बलेनो नवीन फीचर्स आणि गिअरबॉक्ससह सादर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ह्युंदाईने काही बदल करणे गरजेचे बनले आहे. होते.

आतापर्यंत, कारचे 1.2-लिटर इंजिन मॅन्युअल गिअरबॉक्ससह केवळ टॉप-स्पेक Asta (O) व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होते. आता नवीन 1.2 CVT सादर केल्यामुळे, टॉप 1.2 लिटर व्हेरिएंटमध्येही ऑटोमॅटीक गिअरबॉक्सची मिळेल. त्याच वेळी, नवीन 1.0 DCT Sportz वर्जनमुळे आता टर्बो-पेट्रोल DCT पर्याय खालच्या ट्रिममध्ये देखील उपलब्ध असेल. Turbo DCT पूर्वी फक्त Asta आणि Asta(O) व्हेरिएंवर उपलब्ध होता.

अनेक नवीन फीचर्स..

नवीन व्हेरिएंट आणण्याव्यतिरिक्त, कंपनीने कारमध्ये अनेक नवीन फीचर्स देखील जोडली आहेत. उदाहरणार्थ, Sportz व्हेरिएंट आता ऑटोमॅटिक AC मिळतो, तर पूर्वी फक्त मॅन्युअल एसी होता. ऑटोमॅटिक एसी आत्तापर्यंत फक्त Asta व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होता. वाहनामध्ये क्रूझ कंट्रोल देखील जोडण्यात आले आहे, जे पूर्वी फक्त Asta (O) व्हेरिएंटपुरते मर्यादित होते. याशिवाय, i20 Asta ट्रिमला आता एक सनरूफ देखील मिळतो, जो पूर्वी फक्त 1.0 iMT Asta मॉडेलवर होता.

Asta व्हर्जनमध्ये क्रूझ कंट्रोल जोडले गेले आहे, परंतु आता कनेक्ट केलेल्या कार फीचर्ससह 10.25-इंच डिस्प्लेऐवजी एक लहान 8.0-इंच टचस्क्रीन मिळते. दरम्यान, Asta(o) ला ब्लू लिंक सिस्टमसाठी काही अतिरिक्त व्हॉइस कमांड मिळतात. शेवटी, मॅग्ना व्हेरियंटवरील व्हील कव्हर्स आता सिल्वरऐवजी गन मेटल शेडमध्ये फिनिशसह दिण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT