Hero Cycles OP Munjal eSakal
विज्ञान-तंत्र

Hero Cycles : कामगारांनी संप केल्यावर मालकाने स्वतः जाऊन बनवल्या सायकल; खऱ्या अर्थाने 'हीरो' होते ओम प्रकाश मुंजाळ

OP Munjal : 1956 साली मुंजाळ ब्रदर्स कंपनीने स्पेअर पार्ट्सऐवजी पूर्ण सायकल बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सायकलच्या या ब्रँडला 'हीरो' नाव दिलं.

Sudesh

OP Munjal Death Anniversary : तुम्ही लहानपणी सायकल चालवली असेल, किंवा अजूनही सायकल वापरत असाल; तर 'हीरो सायकल्स' कंपनी तुम्हाला माहित असायलाच हवी. या कंपनीची स्थापना ओम प्रकाश मुंजाळ यांनी केली होती. ओपी मुंजाळ म्हणून ते ओळखले जात. त्यांचा प्रवास आज कित्येकांना प्रेरणा देतो.

ओपी मुंजाळ यांचा जन्म पाकिस्तानच्या कमालिया प्रांतात झाला होता. 1944 साली त्यांचं कुटुंब पाकिस्तान सोडून भारतातील अमृतसर येथे रहायला आलं. हीरो कंपनीची सुरुवात त्यांनी आपल्या तीन भावांसोबत मिळून केली होती. सुरुवातीला 'मुंजाळ ब्रदर्स' ही कंपनी सायकलचे स्पेअर पार्ट्स बनवत होती. 1947 साली झालेल्या फाळणीनंतर ही कंपनी लुधियानाला शिफ्ट झाली.

1956 साली मुंजाळ ब्रदर्स कंपनीने स्पेअर पार्ट्सऐवजी पूर्ण सायकल बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सायकलच्या या ब्रँडला 'हीरो' नाव दिलं. ही भारतातील पहिली सायकल उत्पादक कंपनी होती. यासाठी त्यांना तेव्हाचे 50,000 रुपये बँकेकडून कर्ज घ्यावं लागलं होतं.

कर्मचाऱ्यांचा संप

ओपी मुंजाळ यांचा एक किस्सा अगदी प्रसिद्ध आहे. पंजाबमध्ये एकदा कर्मचाऱ्यांचा सर्वसाधारण संप होता. यामुळे 'हीरो सायकल्स' कंपनीतील कर्मचारीही संपावर होते. कर्मचारी त्यामुळे घरी जायला निघाले. यावेळी मुंजाळ आपल्या केबिनमधून बाहेर आले आणि सर्वांना म्हणाले, "तुम्हाला घरी जायचं असेल तर जाऊ शकता. माझ्याकडे भरपूर ऑर्डर्स आहेत, त्यामुळे मी काम करणारच." असं म्हणून त्यांनी मशीन्स सुरू केल्या आणि स्वतःच सायकल बनवायला लागले.

कामगारांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते म्हणाले, की डीलर्स संपाचं कारण समजून घेतील. मात्र, ज्या मुलाला आपल्या आई-वडिलांनी वाढदिवसानिमित्त सायकल घेण्याचं वचन दिलं आहे, त्याला हे कारण कसं समजेल? यानंतर सर्व कामगार देखील कामावर परतले, आणि पेंडिंग ऑर्डर्स पूर्ण झाल्या.

सायकल बनवण्याचा रेकॉर्ड

सुरुवातीला हीरो कंपनीत दिवसाला 25 सायकल्स तयार होत होत्या. मात्र कालांतराने ही संख्या वर्षाला एक लाख सायकल्स एवढी झाली. 1986 सालापर्यंत कंपनीने प्रत्येक वर्षी 22 लाखांहून अधिक सायकल तयार करुन एक वेगळा रेकॉर्ड केला होता. यामुळेच 1986 साली हीरो कंपनीला जगातील सर्वात मोठी सायकल निर्माती कंपनी म्हणून ओळखलं गेलं. यासाठी त्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली.

ओम प्रकाश मुंजाळ आणि त्यांच्या भावांच्या मेहनतीमुळे ही कंपनी आजही अगदी जोमाने काम करत आहे. मुंजाळ ब्रदर्स हे सध्या 20 पेक्षा अधिक कंपन्या चालवतात. 13 ऑगस्ट 2015 रोजी ओपी मुंजाळ यांचं निधन झालं. ते आज या जगात नसले, तरी त्यांचा कंपनी उभारण्याचा प्रवास हा कित्येकांना प्रेरणा देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT