The Himalayan 450: A Hit Among Young Riders esakal
विज्ञान-तंत्र

Himalayan 450 : रॉयल एन्फिल्डची हिमालयन ४५० बनलीये तरुणांची पहिली पसंत;मायलेज आणि नवे फीचर्स तुम्हाला करतील शॉक,जाणून घ्या

Royal Enfield Himalayan 450 : हिमालय पर्वतातील खडकाळ रस्त्यांवर आणि बदलत्या हवामानात सुद्धा बेस्ट परफॉर्मन्स

Saisimran Ghashi

Royal Enfield : रॉयल एन्फिल्डची हिमालयन-४५० ही नावाप्रमाणेच दणकट आणि रुबाबदार असून तरुणाईकडून त्यास पसंती दिली जात आहे. खडकाळ भागात, दऱ्या खोऱ्यात आणि पर्वतरांगात राईड करण्याची हौस असलेल्या तरुणांसाठी रॉयल एन्फिल्डने नुकतीच हिमालयन ४५० आणली आहे.

हिमालय पर्वतातील खडकाळ रस्त्यांवर आणि बदलत्या हवामानात चालविण्यासाठी सुलभ असल्याने तिला हिमालयन हे पूरक नाव देण्यात आले आहे. जबरदस्त इंजिन, आकर्षक फीचर आणि डिझाइनने लक्ष वेधून घेणारी हिमालयन चालवणे थरारक अनुभव राहू शकतो. सुमारे १९६ किलो वजनाची हिमालयन दुचाकीवरून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि कच्च्या रस्त्यावर साहसी राईडसाठी उपयुक्त ठरते.

या गाडीची कार्यक्षमता, तंत्रज्ञान उच्च प्रतीची असून नवी हिमालयन जुन्या मॉडेलच्या तुलनेत अधिक शक्तीशाली इंजिनसह उपलब्ध आहे. यात ४५२ सीसीचे लिक्विड कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन असून ते ८ हजार आरपीएमला ४० बीएचपीची कमाल ऊर्जा तयार करते आणि ५,५०० आरपीएमला ४० न्यूटन मीटरचा पिक टॉर्क देते.

सहा गिअरसह असणाऱ्या या बाईकला स्लीप आणि असिस्ट क्लच देखील आहे. हिमालयनचे मायलेज अंदाजित ३० किलोमीटर प्रति लिटर असून त्याचा कमाल वेग १३५ किलोमीटर प्रतितास एवढा आहे. सतरा लिटरची पेट्रोल टाकी असून त्यापैकी ३.४ लिटर राखीव ठेवण्यात आले आहे.

हिमालयनचा ग्राउंड क्लिअरन्स २३० मिमी असून ती कोणत्याही खडकाळ भागातून सहजपणे चालवता येते. शिवाय जीपीएस नेव्हीगेशन, चार्जिंग पॉइंट असून, स्पिडोमीटरमध्ये कमाल तापमान पाहण्याची सुविधा आहे. हेडलाइट, ब्रेकलाईट एलएडी श्रेणीतील असून पासिंग लाइट देखील आहे. चालकांसाठी ॲडजेस्टबेल सीट असून त्याची उंची ८२५ मिमीच्या आसपास आहे. व्हिलबेस १५१० मिमी असून ते वायर स्पोक रिमसह आहेत.

हिमालयनमध्ये डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनेल एबीएस, कलर टीएफटी डिप्स्ले, स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी यासारख्या सुविधा आहेत.हिमालयन ४५० हे ‘ट्विन स्पार फ्रेम’, समोरचे सस्पेन्शन ‘अपसाईट डाऊन फ्रंट फॉर्क्स’ आणि मागचे सस्पेन्शन ‘प्री लोडेड ॲजेस्टेबल मोनॉशॉक’ युक्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT