होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. लोकांना प्रत्येक छोट्या छोट्या सेलिब्रेशनचे फोटो काढायचे असतात. त्यात होळी हा सणही मागे नाही. या दिवशी होळी खेळल्यानंतर त्याचे फोटो-व्हिडिओही काढले जातील. पण जर तुम्ही रंग किंवा पाण्याने होळी साजरी करण्यासाठी बाहेर असाल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल आणि इतर गॅझेट्सची काळजी घ्यावी लागेल. किंबहुना ते पाण्यापासून सुरक्षित ठेवावे लागतील. होळी खेळताना तुमचे गॅझेट सुरक्षित ठेवण्यासाठी या काही टिप्स.
१) इयरफोनला ग्लिसरीन किंवा मॉइश्चरायझर लावा- रंगामुळे तुमचे इयरफोन खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही इयरफोनला ग्लिसरीन मॉइश्चरायझर लावू शकता. यामुळे होळी खेळून झाल्यावर त्यावरील रंग पुसणे सोपे होईल.
२) झिपलॉग पिशवीची मदत घ्या- होळी खेळताना सर्वात सोपी काळजी घेणे केव्हावी चांगले. तुमचा फोन, घड्याळ, स्मार्ट बँड किंवा कोणतेही गॅझेट झिपलॉक किंवा वॉटरप्रूफ पाऊचमध्ये ठेवा.
३) पोर्ट सील करा- तुम्ही फोन किंवा इतर कोणत्याही गॅझेटचे स्पीकर ग्रिल, चार्जिंग पोर्ट हे ओपन पोर्ट कव्हर करण्यासाठी फक्त डक्ट टेप वापरू शकता
४) स्पीकरची घ्या काळजी- तुमच्या मोबाईलचे स्पीकरही महत्वाचे आहेत. त्यासाठी डक्ट टेपने बंद केल्यावर किंवा झिपलॉक बॅगमध्ये ठेवल्यावर स्पीकर खराब होण्यापासून वाचण्यासाठी फोन सायलेंट मोडवर ठेवा.
५) पॅटर्न लॉकचा वापर करा- हाताला रंग लागलेला असल्याने फोन तुमचे फिंगरप्रिंट ओळखू शकत नाही. अशावेळी, तुम्ही तुमचा फोन ऍक्सेस करण्यासाठी पिन किंवा पॅटर्न लॉकचा पर्याय वापरा. पॅटर्न लॉक करून फोन झिपलॉक पिशवीत ठेवा.
६) फोन ओला झाला असेल तर जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. अशावेळी तुमचा बॅटरी कमी म्हणून चार्ज केल्याने फोन खराब होऊ शकतो. तसेच विजेचा शॉक लागण्याचा धोकाही वाढतो.
७) वॉटरप्रूफ रिस्ट बँड कव्हर वापरा- अनेक स्मार्ट घड्याळे आणि फिटनेस बँड IP68 रेट केलेले आहेत. पण,, तुमच्या फिटनेस बँडचे संरक्षण करण्यासाठी मनगटी कव्हर वापरणे चांगला पर्याय आहे. तुम्ही स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँड झाकण्यासाठी प्लास्टिक पिशवी वापरू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.