भारतात दर महिन्याला लाखो टू व्हीलर्सची विक्री होते. बाइक सोबत स्कूटरची सुद्धा बंपर विक्री होते. स्कूटर सेगमेंट मध्ये होंडा ॲक्टिवा खूप आधीपासून टॉप सेलिंग आहे. ॲक्टिवा स्कूटर ११० सीसी आणि १२५ सेगमेंट मध्ये उपलब्ध आहे. लूक आणि फीचर्स सोबत पॉवर आणि मायलेज मध्ये जबरदस्त असलेल्या या स्कूटरची बातच न्यारी आहे.
ॲक्टिवा स्कूटरचे मायलेज 55 kmpl पर्यंत आहे. तुम्ही जर सध्या चांगली स्कूटर शोधत असाल तर या स्कूटरला फायनान्स करून घरी घेऊन जाऊ शकता. या स्कूटरला खरेदीसाठी तुमच्याकडे फक्त १० हजार रुपये असायला हवेत, त्यानंतर ईएमआय आणि अन्य संबंधित माहिती जाणून घ्या.
होंडा ॲक्टिवा स्टँडर्ड
भारतीय बाजारात बेस्ट सेलिंग स्कूटर होंडा ॲक्टिवा ६जी पेक्षा स्वस्त व्हेरियंट ॲक्टिवा एसटीडीची एक्स शोरूम किंमत ७५ हजार ३४७ रुपये आणि ऑन रोड किंमत ८९ हजार ३७१ रुपये आहे. तुम्ही जर या स्कूटरला १० हजार रुपयाच्या डाउनपेमेंट सोबत फायनान्स करीत असाल तर तुम्हाला ७९ हजार ३७१ रुपयाचे लोन घ्यावे लागेल. लोनचा कालावधी ३ वर्षाचा आणि व्याज दर ९ टक्के असेल तर तुम्हाला ३६ महिन्यासाठी २ हजार ५२४ रुपये महिना ईएमआय द्यावा लागेल. म्हणजेच यावर १२ हजाराचे व्याज जाईल.
होंडा ॲक्टिवा डीएलएक्स
होंडा ॲक्टिवा ६जी डीएलएक्स व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत ७७ हजार ८४८ रुपये आहे. याची ऑन रोड किंमत ९२ हजार १०१ रुपये आहे. जर याला १० हजार रुपयाच्या डाउनपेमेंटवर फायनान्स करीत असाल तर तुम्हाला ८२ हजार १०१ रुपयाचे लोन घ्यावे लागेल. लोनचा कालावधी ३ वर्षासाठी आणि व्याज ९ टक्के असेल तर तुम्हाला ३ वर्षासाठी २ हजार ६११ रुपये महिना द्यावा लागेल. या स्कूटरच्या खरेदीवर १२ हजार रुपयाचे व्याज जाईल.
होंडा ॲक्टिवा एच स्मार्ट
होंडा ॲक्टिवा ६जी एच स्मार्ट व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत ८१ हजार ३४८ रुपये आहे. याची ऑन रोड किंमत ९५ हजार ९२१ रुपये आहे. जर तुम्ही या स्कूटरला १० हजार रुपयाच्या डाउनपेमेंट करून ॲक्टिवा एच स्मार्ट व्हेरियंट फायनान्स केले तर तुम्हाला ८५ हजार ९२१ रुपये लोन मिळेल. लोनचा कालावधी ३ वर्षासाठी आणि व्याज ९ टक्के असेल तर पुढील ३६ महिन्यासाठी २ हजार ७३२ रुपये ईएमआय द्यावा लागेल. या स्कूटरच्या खरेदीसाठी १२ हजार रुपयाचे व्याज जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.